बीड बायपासला आले कचरा डेपोचे स्वरूप

By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:07:19+5:302014-11-29T00:30:42+5:30

औरंगाबाद : सातारा बीड बायपास रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, रस्त्याने चालताना नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते. नगर परिषदेने परिसरातील कचऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

Garbage Depot Format of Beed Bypass | बीड बायपासला आले कचरा डेपोचे स्वरूप

बीड बायपासला आले कचरा डेपोचे स्वरूप

औरंगाबाद : सातारा बीड बायपास रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, रस्त्याने चालताना नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते. नगर परिषदेने परिसरातील कचऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायत असल्याने या ठिकाणी सेवा- सुविधा देण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु आता नगर परिषदेच्या घोषणेनंतर परिसरातील सफाई, औषध फवारणी, रस्ते, दिव्याचे प्रश्न मार्गी लागतील असा नागरिकांचा समज होता; परंतु यापैकी कोणतीच कामे करण्यात आलेली नाहीत. परिसरातील हॉटेल व्यावसायिक व नागरिकही घरातील केरकचरा सरळ बीड बायपासवर आणून टाकतात. त्यामुळे बायपासला कचराकुंडीचे स्वरूप निर्माण झाले आहे. याच रस्त्यावर शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह असून, दुर्गंधी व डासांमुळे मुले सतत आजारी पडत आहेत. नाल्याची सफाई तात्पुरती करण्यात आली होती. नगर परिषदेला चावडा कॉम्प्लेक्स परिसर, आयप्पा मंदिर परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊन बीड बायपासवरील तुंबलेला नाला मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Garbage Depot Format of Beed Bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.