'गणपती चालले गावाला...'; छत्रपती संभाजीनगरात बाप्पाला जल्लोषात निरोप
By संतोष हिरेमठ | Updated: September 28, 2023 14:30 IST2023-09-28T14:29:48+5:302023-09-28T14:30:14+5:30
सिडको विसर्जन विहरीत दुपारी एक वाजेपर्यंत १५०० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले

'गणपती चालले गावाला...'; छत्रपती संभाजीनगरात बाप्पाला जल्लोषात निरोप
छत्रपती संभाजीनगर : ' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...' 'गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…' अशा घोषणा देत सिडको- हडकोटील मानाचे गणपती, विविध मंडळे आणि नागरिक आज, गुरुवारी बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप देत आहेत.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, विश्वनाथ स्वामी, प्रतिक अंकुश, रतन कटारिया आदीच्या उपस्थित सिडको-हडकोतील मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मार्तंड ढोल ताशा पथकाच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सिडको विसर्जन विहरीत दुपारी एक वाजेपर्यंत १५०० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले