शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या वाहनचोरांची टोळी औरंगाबादेत अटक

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

औरंगाबाद : औरंगाबादेत येऊन वाहनचोऱ्या करणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका टोळीला विशेष पोलीस पथकाने आज दुपारी चिकलठाणा परिसरात अटक केली.

औरंगाबाद : औरंगाबादेत येऊन वाहनचोऱ्या करणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका टोळीला विशेष पोलीस पथकाने आज दुपारी चिकलठाणा परिसरात अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश मारोती मोहिते (१८), सागर रामदास गायकवाड (२१), आदिनाथ ऊर्फ अजय भीमा धनवटे (१९) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हे सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील रहिवासी आहेत. आरोपींच्या ताब्यातून आतापर्यंत चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, औरंगाबादेतून वाहन चोरून अहमदनगरला घेऊन जाणारी एक टोळी चिकलठाणा परिसरातील हिनानगरात आली आहे, अशी माहिती खबऱ्याकडून पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या विशेष पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाचे फौजदार प्रशांत आवारे, सहायक फौजदार कल्याण शेळके, योगेश गुप्ता, सचिन काशीद, विवेकानंद औटी, संदीप धर्मे यांनी खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी छापा मारला. तेथे वरील चारही आरोपी सापडले. त्यांच्याकडे पाच दुचाकी आढळून आल्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच आरोपींनी या पाचही दुचाकी चोरीच्या असल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यातील एक दुचाकी पुण्यातून चोरटल्याचे, एक नगर जिल्ह्यातील राहुरीतून व दोन औरंगाबादेतून चोरी केल्याचे उघडकीस आले. सध्या चोरटे पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.