कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी विवाहितेवर केला सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 14:41 IST2017-11-04T14:41:05+5:302017-11-04T14:41:12+5:30

वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेला कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Gang rape at Aurangabad | कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी विवाहितेवर केला सामूहिक बलात्कार 

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी विवाहितेवर केला सामूहिक बलात्कार 

औरंगाबाद : वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेला कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 2 नोव्हेंबला रात्री शहराजवळील टाकळी शिवारात ही घटना घडली आहे. या नराधमांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. यातील अनिल वसंत ठोंबरे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरातील संतोषी मातानगर येथील 22 वर्षीय विवाहिता 2 नोव्हेंबरला रात्री 7 वाजण्याच्या सुमारास घरी एकटीच होती. यावेळी तिच्या ओळखीचा मित्र तेथे आला आणि त्याने त्याचा वाढदिवसाची साजरा करायचा आहे,असे सांगून तिला बाईकवरुन पार्टीसाठी नेले. यानंतर तो तिला घेऊन बीड बायपासमार्गे झाल्टा फाटा येथे गेला. याठिकाणी त्याला त्याचे तीन मित्र भेटले. त्यांच्याजवळ जेवणाचे पार्सल आणि दारूच्या बाटल्या व कोल्ड ड्रिंक होतं. 

यानंतर पीडित महिलेला रस्ताच्या बाजूला उभे करून आरोपी आपापसात चर्चा करू लागले, यानंतर तिला जालना रोडमार्गे शेंद्रा एमआयडीसीजवळील टाकळी शिवारात नेण्यात आले. तेथील एका शेतात ते सर्वजण गेले. तेथे तिच्या मित्राने तिला कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजली व तेदेखील दारू प्यायले. दारूमुळे पीडितेला गुंगी येऊ लागताच प्रथम मित्राने तिच्यावर बळजबरी करण्यास सुरवात केली. 
यावेळी पीडितेने त्याचा प्रतिकार केला. तेव्हा सर्वांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडाओरड केली, मात्र एकाने तिचे तोंड दाबून शांत राहण्यासाठी धमकावले.  रात्रीच्या आणि निर्जनस्थळी असल्याने तिचा आवाज कोणापर्यंतही पोहोचला नाही. या चार नराधमांसमोर तिची ताकद कमी पडली. या चारही नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे पीडित महिला बेशुद्ध झाली. 
बेशुद्धावस्थेत आणून टाकले विमानतळासमोर
बेशुद्ध झालेल्या पीडितेला आरोपींनी बाईकवरुन चिकलठाणा विमातनळासमोरील एका पेट्रोलपंपाजवळ रात्रीच्या 11 वाजण्याच्या सुमारास आणून टाकले. पंपावरील लोकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेतील पीडितेला घाटी रुग्णालयात दाखल केले व घटना उघडकीस आली.
 

Web Title: Gang rape at Aurangabad

टॅग्स :