कृषिधन चोरणारी टोळी अटकेत; म्हशी, बैलांची चोरी करून विक्री केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 16:45 IST2021-03-24T16:43:12+5:302021-03-24T16:45:35+5:30

२३ मार्च रोजी रात्री संशयित पिकअप जीप पोलिसांनी करंजखेड येथील काकासाहेब देशमुख चौकात अडविली.

gang arrested by aurangabad rural police; Buffaloes, bulls stolen and sold | कृषिधन चोरणारी टोळी अटकेत; म्हशी, बैलांची चोरी करून विक्री केल्याचे उघड

कृषिधन चोरणारी टोळी अटकेत; म्हशी, बैलांची चोरी करून विक्री केल्याचे उघड

ठळक मुद्देपोलिसांनी आरोपी निसार आणि वसीम यांच्याकडे गाडीतील बैल कोणाचे याविषयी चौकशी केली.बैलांचे दाखले त्यांच्याजवळ नसल्याचे तसेच ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.

औरंगाबाद:  खेड्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील म्हशी आणि बैल चोरणाऱ्या तीन चोरट्याना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीने करंजखेड (ता. कन्नड)गावातील तीन शेतकऱ्यांच्या म्हशी चोरून मालेगावच्या व्यापाऱ्याला विक्री केल्याचे तपासात समोर आले.

शेख निसार शेख महमंद ,वसीम अजीज कुरेशी (२२) आणि सोहेल युसुफ  कुरेशी (२३, सर्व. रा. करंजखेडा, ता. कन्नड) अशी चोरट्यांची नावे आहेत. याविषयी ग्रामीण गुन्हेशाखेकडुन प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार दिपक कैलास वाघ (रा. करंजखेडा) यांच्या गोठ्यातील म्हैस चोरट्यानी १३ मार्च च्या रात्री पळविली होती. दुसऱ्या दिवशी ही घटना समोर आल्यावर वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या गुंह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश राऊत, कर्मचारी वसंत लटपटे, विक्रम देशमुख, वाल्मिक निकम, संजय भोसले,ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर धापसे, योगेश तरमळे आणि जीवन घोलप यांनी तपास सुरू केला. तेव्हा ही चोरी आरोपी निसार शेख याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

पोलीस त्याच्या मागावर असतांना २३ मार्च रोजी रात्री संशयित पिकअप जीप पोलिसांनी करंजखेड येथील काकासाहेब देशमुख चौकात अडविली. यावेळी वाहनात असलेल्या आरोपी निसार आणि वसीम यांच्याकडे गाडीतील बैल कोणाचे याविषयी चौकशी केली. त्यावेळी बैलांचे दाखले त्यांच्याजवळ नसल्याचे तसेच ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी खाक्या दाखविताच गावातील सोहेल कुरेशीच्या मदतीने पशुधन चोरी करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलीस तपासांत त्यांनी दिपक वाघ, शेख सलमान आणि सुर्यभान वळवळे यांच्या म्हशी चोरी केल्या आणि मालेगांव येथील व्यापाऱ्याला विक्री केल्याचे सांगितले. म्हशीची वाहतूक करण्यासाठी बोलेरो जीपचा वापर केल्याचे सांगितले.

पैसे घेतले आपसांत वाटून
आरोपीनी म्हैशी विक्री करुन आलेली रक्कम आपसांत वाटुन घेतली. या पैशातून आरोपी वसीम याने मोबाईल खरेदी केल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपीकडुन मोबाईल जप्त केला.

Web Title: gang arrested by aurangabad rural police; Buffaloes, bulls stolen and sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.