व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारातील भंगारास भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 19:08 IST2018-06-04T19:07:46+5:302018-06-04T19:08:32+5:30

: पैठण रोडवरील व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारातील भंगारास आज दुपारी २. १५ च्या सुमारास भीषण आग लागली.

The furious fire of Videocon Company's scrap yard | व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारातील भंगारास भीषण आग

व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारातील भंगारास भीषण आग

औरंगाबाद : पैठण रोडवरील व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारातील भंगारास आज दुपारी २. १५ च्या सुमारास भीषण आग लागली. ५ बंबाच्या सहाय्याने तब्बल तीन तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पैठण रोडवरील व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. आज दुपारी २.१५ च्या सुमारास अचानक या भंगार साहित्यास आग लागली. आगीची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने तिकडे धाव घेतली. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीमुळे हा संपूर्ण परिसर जळून खाक झाला असून आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

Web Title: The furious fire of Videocon Company's scrap yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.