शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रामा केअरला आणला २़१५ कोटींचा निधी

By admin | Updated: July 30, 2014 00:50 IST

उदगीर : उदगीर, जळकोट, देवणीकरांसाठी उदगीरमध्ये २०० खाटांचे रुग्णालय मंजूर होते.

उदगीर : उदगीर, जळकोट, देवणीकरांसाठी उदगीरमध्ये २०० खाटांचे रुग्णालय मंजूर होते. परंतु निधी मिळत नव्हता. यासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्रे पाठवून, प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करावा लागला. विरोधी पक्षाचा असतानाही त्यांच्याकडून या रुग्णालयासाठी ३ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी आणला. आता ही उभी झालेली इमारत पाहून आमच्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सुटल्याचे समाधान वाटते, अशा शब्दात आ. सुधाकर भालेराव यांनी रुग्णालयाच्या भेटीवेळी काढल्या. नव्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. यानंतर ते म्हणाले की, उदगीर हे दीड लाख लोकसंख्येचे शहर आहे. लातूरपासून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या या शहरातील सर्वसामान्यांसाठी चांगली वैद्यकीय सुविधा म्हणजे उपजिल्हा रुग्णालय. परिसरासह सीमाभागातील नागरिकांचाही उपचारासाठी उदगीरकडेच ओढा असल्याने रुग्णालयावर अतिरिक्त ताण होता. दुसरीकडे मंजूर असूनही फक्त निधी नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातील २०० खाटांचा प्रस्ताव पडून होता. ही बाब ओळखून आ. भालेराव यांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची भेट घेऊन पत्र लिहीले. शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळेच उदगीरच्या २०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला एका झटक्यात निधी मिळून कामाला प्रारंभ झाला. आज उदगीर पालिकेशेजारील जागेत या रुग्णालयाची देखणी वास्तु उभी आहे. (वार्ताहर)लवकरात लवकर उद्घाटन व्हावे ...आ. सुधाकर भालेराव यांनी या इमारतीचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. उपजिल्हा रुग्णालयात जागा कमी पडते आहे. रुग्णांना खाटा पुरत नाहीत. त्यामुळे या इमारतीचे उद्घाटन आरोग्य प्रशासनाने लवकरात लवकर करण्याची गरज आहे. जर याचे उद्घाटन लांबत असेल तर मी स्वत: उपजिल्हा रुग्णालयात जमिनीवर असलेले पेशंट उचलून नव्या इमारतीच्या खाटावर नेऊन झोपवेन असा इशाराही दिला. ट्रामा केअरच्या कामालाही गती...उदगीरमध्ये असलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या कामालाही निधीअभावी गती होती. परंतु या सेंटरलाही २़१५ कोटी इतका निधी आणण्यात आला. त्यामुळे या कामालाही गती मिळाली असून यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे आ. भालेराव यांनी यावेळी बोलताना सांगितले.