फरार कैदी जाळ्यात
By Admin | Updated: October 27, 2015 00:25 IST2015-10-27T00:11:01+5:302015-10-27T00:25:46+5:30
लातूर : औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने आपली पॅरोल रजेची मुदत संपल्यानंतर कारागृहात हजर न होता तो फरार झाला होता.

फरार कैदी जाळ्यात
लातूर : औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने आपली पॅरोल रजेची मुदत संपल्यानंतर कारागृहात हजर न होता तो फरार झाला होता. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात औरंगाबादच्या तुरुंगरक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फरार कैद्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली.
औसा तालुक्यातील तय्यब पाशामियाँ अरब वय ३५ रा. वांगजी याच्याविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्कार प्रकरणी कलम ३७६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात लातूर येथील विशेष न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी दहा वर्षांची कैद आणि १५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तय्यब पाशामियाँअरब हा औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात ही शिक्षा भोगत असताना १६ जुलै २०१५ पासून ३० दिवसांच्या पॅरोल रजेवर होता. मात्र तय्यब पाशामियाँअरबने आपली रजा संपल्यानंतर स्वत:हून हजर न होता फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला वांगजी गावात रविवारी रात्री पकडले़ (प्रतिनिधी)