शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० पेट्रोल पंपांवर इंधन समस्या

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : तीन पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून जिल्ह्यात १७५ च्या जवळपास पेट्रोलपंप आहेत.

औरंगाबाद : तीन पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून जिल्ह्यात १७५ च्या जवळपास पेट्रोलपंप आहेत. त्यातील एचपीसीएलच्या ४० पेट्रोलपंपांना गेल्या आठवड्यापासून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा उशिराने होऊ लागला आहे. या पंपांवर कधी पेट्रोल संपते, तर कधी डिझेल. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मनमाडजवळील पानेवाडी येथे बीपीसीची पाईपलाईन आहे. मुंबईहून ही पाईपलाईन पानेवाडीपर्यंत आणण्यात आली आहे. या ठिकाणी बीपीसी, एचपीसीएल व आयओसीचे या पेट्रोलियम कंपन्यांचे डेपो आहेत. पेट्रोलपुरवठा करणाऱ्या बीपीसीच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम कंपनीने हाती घेतले तसेच मुंबई येथील एचपीसीएलच्या रिफायनरीमध्ये शटडाऊन सुरू झाल्यामुळे याचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर झाला. बीपीसीने रतलाम येथून पेट्रोल- डिझेल आणून त्याचा पुरवठा केला. मात्र, एचपीसीएलच्या पेट्रोल पंपवाल्यांना पानेवाडीऐवजी वाशी व लोणी येथील डेपोतून पेट्रोल- डिझेल आणावे लागत आहे. त्या डेपोच्या हद्दीतील पेट्रोल पंपवाल्यांना इंधन दिल्यानंतर मग औरंगाबादेतील पेट्रोल पंपवाल्यांच्या गाड्या भरल्या जात आहेत. यामुळे गाड्या येण्यास दोन ते तीन दिवसांचा उशीर होत आहे. परिणामी, बुधवारी शहरातील एचपीसीएलचे ५ पेट्रोल पंप कोरडे पडले होते. जिल्ह्यातील ४० पेट्रोल पंपांवर हीच परिस्थिती होती. मात्र, गुरुवारी शहरातील त्या ५ पेट्रोल पंपांवर पेट्रोलने भरलेल्या गाड्या आल्यात. मात्र, जिल्ह्यातील एचपीसीएलच्या काही पंपांवर पेट्रोल होते, डिझेल नव्हते, तर काही पेट्रोल पंपांवर डिझेल होते, तर पेट्रोल संपले होते. काही पेट्रोल पंप कोरडे पडले होते. यासंदर्भात पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एचपीसीएलच्या ४० पेट्रोल पंपांवर रोज दीड ते दोन लाख लिटर पेट्रोल व सुमारे ५ लाख लिटर डिझेलची आवश्यकता असते. गेल्या आठवड्यात रोज फक्त २५ टक्केच आवक होत असल्यामुळे पंप कोरडे पडले. दोन दिवस लागतील एचपीसीएलचे विक्री अधिकारी प्रेमसिंग यांनी सांगितले की, पानेवाडी डेपोतील पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. तसेच मुंबईतील रिफायनरी पूर्ववत सुरू झाली आहे. आज औरंगाबादेत एचपीसीएलच्या काही पंपांवर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा झाला. शुक्रवारी ग्रामीण भागातील पंपावरही पेट्रोल-डिझेल पोहोचेल. पुरवठा सुरळीत होण्यास दोन दिवस लागतील.ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष वाळूज येथील पेट्रोल पंप मालक आनंद संचेती म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे आमचा पेट्रोल पंप कोरडा होता. शहरात ओरड होत असल्यामुळे तेथे लगेच पेट्रोल पाठविले जाते; परंतु ग्रामीण भागातील पंपांकडे कंपन्यांचे दुर्लक्ष होते.