शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

ॲडव्हान्स न भरणाऱ्या पेट्रोल पंपचालकांमुळे वाहनधारकांना रांगेत उभे राहण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:42 IST

ऑइल कंपन्यांची नवी अट; पैसे भरल्याशिवाय पेट्रोलचा टँकर निघणार नाही.

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑइल कंपन्यांनी ॲडव्हान्स पेमेंटची अट लागू केल्यानंतर शहरातील पेट्रोल पंपचालकांचा कारभार उघडा पडला आहे. वर्षानुवर्षे उशिरा पेमेंट करण्याची सवय असलेल्या पंपचालकांना आता ॲडव्हान्स रक्कम भरणे कठीण जात असल्याने अनेक पंप बुधवारी ‘ड्राय’ झाले होते. मात्र, या ढिसाळ नियोजनाचा थेट फटका वाहनधारकांना बसत आहे.

पेट्रोल पंपांवर पेट्रोल नसल्याने व काही पंपांवर पाट्या लागल्याने वाहनधारकांनी लगेच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लावल्या. वाहनधारकांकडून रोख रक्कम घेणारे पेट्रोलपंपचालक मात्र, ऑइल कंपन्यांना ॲडव्हान्स पेमेंट करीत नाहीत आणि पेट्रोल मिळाले नाही, तर हेच पेट्रोल पंपचालक ‘पेट्रोल संपल्या’चा फलक लावून जनतेला ताण देण्याचे काम करीत असल्याचे सत्य उजेडात आले.

ज्या पेट्रोल पंपचालकांनी ॲडव्हान्स भरला, त्या पंपावर नियमित पेट्रोल पुरवठा सुरू होता. पण, अन्य पेट्रोल पंप बंद असल्याने जिथे पेट्रोल आहे, त्या पंपांवर वाहनधारकांनी मोठी रांग लावली. ही रांग रात्री उशिरापर्यंत होती.

बीड बायपासहून सुरुवातपेट्रोल पंप ‘ड्राय’ होण्याची सुरुवात सर्वप्रथम बीड बायपास येथून झाली. एकापाठोपाठ ३ पेट्रोल पंपांवरील टाक्या रिकाम्या झाल्या. त्यानंतर काल्डा कॉर्नर, जुना जकात नाका येथील महापालिकेचे पेट्रोल पंप बंद पडले. टंचाईच्या अफवा पसरताच काही पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या. उकाड्यात नागरिकांना ताटकळावे लागले.

साठा आहे तरी त्रासपानेवाडी येथील डेपोत पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही केवळ पेमेंटच्या वादामुळे पुरवठा ठप्प झाला आहे.-प्रीतम जाधव, वाहनधारक, शिवाजीनगर

वेठीस धरण्याचा प्रकारपंपचालकांनी वेळेत व्यवहार पूर्ण न करता ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.-रमेश भालेराव, वाहनधारक, उल्कानगरी

उद्या सकाळी टँकर येईलआम्हाला काही कारणास्तव पैसे भरण्यास उशीर झाला. यामुळे आमच्या पेट्रोल पंपावर स्टॉक संपला. पण, आम्ही लगेच ॲडव्हान्स रक्कम भरली. गुरुवारी सकाळी टँकर येईल.स्वप्नील पाटील, व्यवस्थापक, प्रगती पेट्रोल पंप (मनपा)

बैठक घेण्याचे ऑइल कंपन्यांना आवाहनऑइल कंपन्यांनी पेमेंटची पद्धती बदलली आहे. आधी पेमेंट नंतर पेट्रोल, असे धोरण अवलंबले आहे. त्यात एकाच वेळीस सर्व पेट्रोल पंपचालकांनी पैसे भरल्याने डेपोतून पेट्रोल भरून निघायला टँकरला उशीर होत आहे. यामुळे शहरात काही पेट्रोल पंप बंद पडले. पण, गुरुवारी पेट्रोल दाखल होईल. वाद सोडविण्यासाठी बैठक घेण्याचे आवाहन करणारा ‘मेल’ आम्ही ऑइल कंपन्यांना पाठविला आहे.-अखिल अब्बास, अध्यक्ष, पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन

English
हिंदी सारांश
Web Title : No advance payment by petrol pumps causes long queues.

Web Summary : Petrol pump owners' failure to pay in advance led to fuel shortages. Many pumps ran dry, causing long queues and hardship for vehicle owners in Chhatrapati Sambhajinagar. Payment disputes are disrupting supply despite sufficient stock.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPetrol Pumpपेट्रोल पंप