शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपात विरोधी पक्षनेता अन् नगरसेवकात फ्रीस्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 23:47 IST

नांदेड :महापालिकेत विरोधी पक्ष नेत्यावरुन शिवसेनेत उघडउघड दोन गट पडले आहेत़

नांदेड :महापालिकेत विरोधी पक्ष नेत्यावरुन शिवसेनेत उघडउघड दोन गट पडले आहेत़ त्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या नगरसेवकाच्या वॉर्डातील दलित वस्तीची कामे बंद करण्यासाठी विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर हे पत्र देत नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक अशोक उमरेकर यांनी त्यांच्याच कक्षात वाद घातला़ हा वाद एवढा विकोपाला गेला, त्याचे पर्यवसान फ्रीस्टाईल हाणामारीत झाले़ त्यानंतर सायंकाळी मात्र दोघांमध्ये समेट झाला़, परंतु या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे़ महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ बोटावर मोजण्याएवढेच आहे़ परंतु त्याच आधारावर विरोधी पक्षनेतेपदाचा मान सेनेला मिळाला़ यापूर्वीचे विरोधी पक्षनेता दीपकसिंह रावत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विरोधी पक्षनेता पदावर सेनेतील अनेक नगरसेवकांनी दावा केला होता़ त्यासाठी जोरदार फिल्डिंगही लावली होती़ परंतु ऐनवेळी विरोधी पक्षनेते पदाची माळ बालाजी कल्याणकर यांच्या गळ्यात पडली़ त्यामुळे कल्याणकरांच्या विरोधात नाराजांची फळी एकत्र झाली होती़ परंतु पक्षशिस्त म्हणून कल्याणकर यांना पाठिंबा देत असताना, त्यांच्या चुकांचा डांगोरा पिटण्याची एकही संधी नाराज नगरसेवकांनी सोडली नाही़ त्यात सेनेचे नगरसेवक अशोक उमरेकर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्या वॉर्डात दलित वस्तीअंतर्गत कामे मंजूर करण्यात आली होती, परंतु गाडीवाले यांच्या वॉर्डात दलित वस्तीच नसल्यामुळे ही कामे रद्द करण्यात यावी असे पत्र उमरेकर यांनी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे दिले होते़ त्यानंतर हे काम रद्द करण्यात आले होते़ परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत याच कामांना मंजुरी देण्यात आली़ याबाबत तक्रार करण्यासाठी बुधवारी सायंकाळी चार वाजता उमरेकर यांनी थेट विरोधी पक्ष नेत्यांचे कार्यालय गाठले़ यावेळी त्यांनी कल्याणकर यांना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र का दिले नाही? असा प्रश्न केला़ त्यावर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली़ हा वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी सुरु झाली़ यावेळी कक्षात काही मोजके पत्रकार अन् मनपाचे कर्मचारीही होते़ दोघानींही एकमेकांवर खुर्च्या उचलल्या होत्या़ यावेळी प्रत्यक्षदर्शींनी मध्यस्थी करुन भांडण सोडविले़ त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत कल्याणकर यांच्या कक्षात सेना नगरसेवकांची समझोत्यासाठी बैठक सुरु होती़ रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये समेट झाल्याचे बोलले जात होते़ (प्रतिनिधी)