शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

मावळणारे बालपण अन् खुणावणारे तारुण्यपण जपणारे ‘मैत्री क्लिनिक ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:43 IST

किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्यांचे निराकरण जिल्ह्यातील ३२ मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून होत आहे. एक प्रकारे मावळणारे बालपण अन् खुणावणारे तारुण्यपण जपले जात आहे.

औरंगाबाद : किशोरवयीन मुला-मुलींना वाढत्या वयात शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक बदलासंदर्भात अनेक प्रश्न भेडसावतात. या प्रश्नांवर आजही आई-वडील, शिक्षक अथवा अन्य कोणाशी मनमोकळेपणाने बोलले जात नाही. किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्यांचे निराकरण जिल्ह्यातील ३२ मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून होत आहे. एक प्रकारे मावळणारे बालपण अन् खुणावणारे तारुण्यपण जपले जात आहे.

१० ते १९ वर्षे वयोगट हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या काळात मुला-मुलींच्या अडचणी व समस्यांची जाणीव होऊन त्यांची समाधानकारक उत्तरे मिळणे गरजेचे असते. त्यातून त्यांच्या भावी जीवनावर सकारात्मक परिणाम घडण्यास मदत होते. याच उद्देशाने आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी मैत्री क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.

याठिकाणी कार्यरत समुपदेशकांच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि आवश्यक उपचार केले जातात. किशोरवयीन मुला-मुलींनी समजण्याची जबाबदार मैत्री क्लिनिकमधून पार पाडली जाते. शारिरीक, मानसिक, भावनिक बदल घडून येताना मुले-मुली अनेकदा बावरून जातात किंवा बैचेन होतात. यावेळी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास त्यांची उत्सुकता असते. अनेकदा गैरसमज असतात. ही उत्सुकता आणि गैरसमज दूर करण्याचे व शास्त्रीय पद्धतीने माहिती देण्याचे काम मैत्री क्लिनिकमार्फत केले जात आहे.

जिल्ह्यातील ५ हजार ७५२ किशोरवयीन मुला-मुलींना यावर्षी समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मुलींची संख्या सर्वाधिक म्हणजे ३ हजार एवढी आहे. क्लिनिक, शाळा, महाविद्यालयांसह तरुण मंडळे आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊनही समुपदेशकांकडून मार्गदर्शन केले जात आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, आरोग्य व आहारविषयक माहिती, ताणतणाव, समुपदेशन व सल्ला, विवाहपूर्व मार्गदर्शन, कुटुंबनियोजन साधने आदींविषयी समुपदेशन केले जात आहे.

चांगला कार्यक्रममैत्री क्लिनिक हा आरोग्य विभागाचा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. याद्वारे किशोरवयीन मुला-मुलींच्या व्यक्तिगत, वयात येताना निर्माण होणारे प्रश्न, अडचणी आदींचे निराकरण केले जात आहे.-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

जिल्हा रुग्णालयातही क्लिनिकमैत्री क्लिनिकमध्ये किशोरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. याठिकाणी पुस्तकेदेखील असतात. त्याचाही लाभ होतो. जिल्हा सामान्य रुग्णालयातही मैत्री क्लिनिक सुरू केले जाणार आहे.-डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबाद