मोकळा कांदा लिलावाच्या मजुरांना होतोय फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:06 IST2021-04-23T04:06:22+5:302021-04-23T04:06:22+5:30
बाजार समितीच्या वतीने कांदा बाजारमध्ये पहिले गोण्या भरून कांदा विक्रीसाठी येत होत्या. दुकानावर आवक यावी म्हणून व्यापाऱ्यांना वाहनधारकांना प्रती ...

मोकळा कांदा लिलावाच्या मजुरांना होतोय फायदा
बाजार समितीच्या वतीने कांदा बाजारमध्ये पहिले गोण्या भरून कांदा विक्रीसाठी येत होत्या. दुकानावर आवक यावी म्हणून व्यापाऱ्यांना वाहनधारकांना प्रती गोणी तीस ते चाळीस रुपये कमिशन द्यावे लागत होते. तर शेतकऱ्यांना एक गोणी विकत घेण्यासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत होते. याची दखल घेत दोन महिन्यांपूर्वी दिवंगत संभाजी पाटील डोणगावकर यांनी व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन मोकळा कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय शेतकरी, मोलमजूर, व्यापारी यांच्या हिताचा ठरत आहे.
मोकळा कांद्याचा लिलाव बाजार समितीचा कर्मचारी पुकारीत असतो. ज्या व्यापाऱ्यांना कांदा मालाची खरेदी करायची. तो व्यापारी बोली बोलतो. त्यामुळे व्यापाऱ्यांची चढाओढ होते. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. आठवड्यातून तीन मार्केंटला दीडशे ते दोनशे वाहन भरून कांदा विक्रीला येत आहे. मजुराला कांद्याची गोणी भरण्यासाठी प्रती गोणी दहा रुपये मिळत आहे. तीनशे ते चारशे रुपये रोजंदारी मिळू लागली आहे.