शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांचा पाणीप्रश्न गंभीर

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

तेर : उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येथील तेरणा धरणात सद्यस्थितीत केवळ बारा टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने

तेर : उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येथील तेरणा धरणात सद्यस्थितीत केवळ बारा टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने या चार गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. येत्या काही दिवसांत या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करावी लागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. येथील तेरणा नदीवरील तेरणा धरणातून तेर, ढोकी, तडवळा आणि येडशी या चार गावांना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. यातील तेर गावाची लोकसंख्या १२ हजार ४७१, ढोकीची १४ हजार, येडशीची १९ हजार तर तडवळ्याची लोकसंख्या वीस हजार आहे. यंदा धरण परिसारत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा होऊ शकलेला नाही. चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधीकरणाला दररोज ८० लाख लिटर पाण्याचा उपसा करावा लागतो. याशिवाय उस्मानाबाद शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ दोन महिने पुरू शकेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे चारही गावांना जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता निमारण झाली आहे. (वार्ताहर)तेर गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या ग्रामंचायतीचे दोन बोअर, तीन आड व दोन हातपंप या स्त्रोतांचा वापर केला जात आहे. या स्त्रोतांद्वारे गावाला सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून, पुढील काळात खाजगी स्त्रोतांचे अधिग्रहण करून तेरवासियांची तहान भागविण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. पाण्याचा अपव्यय४तेर गावाला अगोदरच तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी जलवाहिनीला गळतीलागली असून, काही ठिकाणी वॉल्व्हमधून पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. याकडे लक्ष देऊन पाण्यचा अपव्यय थांबविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.