रोडरॉबरी प्रकरणी चौघांना पकडले

By Admin | Updated: August 18, 2015 23:47 IST2015-08-18T23:47:57+5:302015-08-18T23:47:57+5:30

आष्टी: गाडी अडवून व्यापाऱ्यांकडून सव्वा लाख रुपये लुटणाऱ्या चौघांना आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने मंगळवारी पकडले. तालुक्यातील बीड सांगवी येथील

Four robbers arrested in the case | रोडरॉबरी प्रकरणी चौघांना पकडले

रोडरॉबरी प्रकरणी चौघांना पकडले


आष्टी: गाडी अडवून व्यापाऱ्यांकडून सव्वा लाख रुपये लुटणाऱ्या चौघांना आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने मंगळवारी पकडले.
तालुक्यातील बीड सांगवी येथील व्यापारी विशाल कासवा यांचे आष्टी येथे दुकान आहे. काम आटोपून कासवा व त्यांचे मित्र राहुल बोरा हे दुचाकीवरून १६ आॅगस्ट रोजी आष्टीहून बीडसांगवीकडे रात्री साडे नऊच्या सुमारास जात होते. दरम्यान, चौघांनी गाडी अडवून त्यांच्याजवळील सोन्याची चैन, हातातील अंगठ्या, दोन मोबाईल, तीन हजार रुपये असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली.
आष्टी ठाण्याचे निरिक्षक दिनेश आहेर यांनी या प्रकरणातील आरोपी सचिन अशोक टकले, विकास सोन्याबापु म्हस्के, रामेश्वर अभिमान काळे, बाबासाहेब सोन्याबापु म्हस्के यांना ताब्यात घेतले. पोनि आहेर यांच्यासह सपोनि मालुसरे, शेख, पोकॉ तांदळे, कदम, शिकेतोंड यांनी केली.
दरम्यान, त्यांनी चोरी केलेला ऐवज मिळणे आवश्यक आहे. (वार्ताहर)
मास्टमार्इंड मनसेचा तालुकाध्यक्ष
या वाटमारीचा मास्टरमार्इंड सचिन टकले हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Four robbers arrested in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.