शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून मानधन थकले

By admin | Updated: August 31, 2015 13:21 IST

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन चार महिन्यांपासून थकले असल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अंगणवाडी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ
 
नांदेड : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन चार महिन्यांपासून थकले असल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ग्रामीण भागात ३ हजार १0 अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. तर शहरी भागातही तीन प्रकल्पात ६00 अंगणवाडी कर्मचारी काम करतात. या कर्मचार्‍यांचे मानधन ४ महिन्यांपासून थकले आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा ४ हजार १0 रूपये मानधन दिले जाते. यात एप्रिल २0१५ पासून १ हजार रूपयांची वाढ झाली आहे. 
जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनासाठी बजेट नसल्याची माहिती दिली जात आहे. अपुरे मानधन व ते ही चार - चार महिने मिळत नसल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आपला चरितार्थ कसा भागवावा? असा प्रश्न राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षा शततारका काटकाडे यांनी उपस्थित केला आहे. 
याबाबत अधिकार्‍यांना विचारणा केली असता बजेट मंजूर नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनाचा प्रश्न हा आघाडी सरकारच्या कार्यकाळात कधीही निर्माण झाला होता. मात्र अच्छे दिन चे स्वप्न दाखवत केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या कालावधीत मात्र अंगणवाडी कर्मचार्‍यांना अच्छे दिन बघायला मिळाले नाहीत. १ एप्रिल २0१५ पासून अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ केली असली तरी वाढीव मानधन तर सोडाच पण मूळ मानधनही मिळत नसल्याने अंगणवाडी कर्मचारी अच्छे दिनच्या प्रतिक्षेत आहेत. 
दुसरीकडे अंगणवाडी कर्मचार्‍यांवर मूळ कामांसह इतर विभागाची कामे सोपविण्यात प्रशासन धन्यता मानत आहे./ शहरी भागात जागा रिक्त
शहरातील तीन प्रकल्प कार्यालयांतर्गत अंगणवाडी कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. परिणामी अंगणवाडीत अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत. प्रकल्प कार्यालय १ अंतर्गत १४0 कर्मचारी असून २ मध्ये १0७ आणि ३ मध्ये १0४ कर्मचारी आहेत. रिक्त असलेल्या जागा भरण्याबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू केली जात नाही. याकडे संबंधितांनी कानाडोळाच केला आहे. पाठपुरावा सुरू
अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनाचा प्रश्न जून २0१५ पासून निर्माण झाला आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनासाठी राज्यात बजेट उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. बजेटसंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे-
दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण.