वैैधानिक विकास मंडळाच्या भांडारातून पळविले चार मॉनिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 21:01 IST2018-12-28T20:57:21+5:302018-12-28T21:01:13+5:30

वैैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयातील मागील खोलीच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी भंगारात काढण्यात आलेले चार जुने मॉनिटर चोरून नेले. ही घटना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली

Four monitors escaped from the Warehouse Development Board | वैैधानिक विकास मंडळाच्या भांडारातून पळविले चार मॉनिटर

वैैधानिक विकास मंडळाच्या भांडारातून पळविले चार मॉनिटर

औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पस मधील वैैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयातील मागील खोलीच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी भंगारात काढण्यात आलेले चार जुने मॉनिटर चोरून नेले. ही घटना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठावाडा वैैधानिक विकास मंडळाचे कार्यालय आहे.या कार्यालयाच्या मागील बाजूच्या खोलीत जुन्या वस्तूंचे भांडार आहे. या खोलीत भंगारात काढण्यात आलेल्या कार्यालयीन वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे. या खोलीच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आतील जुने चार मॉनिटर चोरून नेले. या मॉनिटरची भंगारातील किंमत पाचशे रुपये असावी. गुरूवारी सायंकाळी प्रशासकीय अधिकारी पुरूषोत्तम कन्हैय्या एम्पाल हे भांडारखोलीकडे गेले तेव्हा त्यांना खोलीचे दार लोटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरट्यांनी चार मॉनिटर चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार १७ ते २७ डिसेंबर दरम्यान ही चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: Four monitors escaped from the Warehouse Development Board