शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख हेक्टर कापूस धोक्यात

By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड यंदा तरी भरघोस पीक येईल अन् सावकाराचे व बँकेचे देणे जाईल. बळीराजाच्या या आशेवर पुरते पाणी फिरले असल्याचे चित्र बीड जिल्हयात आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडयंदा तरी भरघोस पीक येईल अन् सावकाराचे व बँकेचे देणे जाईल. बळीराजाच्या या आशेवर पुरते पाणी फिरले असल्याचे चित्र बीड जिल्हयात आहे. जिल्हयात ४ लाख ३० हजार ९२ हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पिक आहे. मात्र कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला असून लाल्याचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ,अशी मागणी शेतकरी व बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील सरपंच अंकुश गोरे यांनी केली आहे.मागील तीन ते चार वर्षापासून बीड जिल्हयात अल्प पाऊस होत आहे. गतवर्षी कापसाला भाव चांगला न मिळाल्याने शेतकरी पुरता कर्जात बुडाला. यंदा तरी चांगले पिक येईल या आशेवर असलेल्या बळीराजाच्या पांढऱ्या सोन्यावर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हादरला आहे. बीड जिल्हयात कापूस, सोयाबीन व उस ही नगदी पिके आहेत. यंदा जिल्हयात ४ लाख ३० हजार ९२ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. सुरूवातीला म्हणजेच जून-जुलै दरम्यान लागवडी पुरता पाऊस झाला. पाऊस पडला म्हटल्यावर काही शेतकऱ्यांनी उसणवारी तर काहींनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेवून कापसाची लागवड केली. जुलै नंतर मात्र पावसाने ताणल्याने कापसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. परिणामी खर्च तर झाला आता उत्पन्नाचा भरोसा नाही. अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे अर्थिक संकट उभा ठाकले आहे याबाबत कृषी उप संचालक बी. एम. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बीड जिल्हयात कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झालेला असल्याची माहिती आमच्या कार्यालया पर्यंत अद्याप पर्यंत आलेली नाही. अहवाल येताच पहाणी करून वरिष्ठ कार्यालयाच्या सुचने प्रमाणे पुढील प्रक्रीया केली जाईल असे त्यांनी सांगितले.