शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाची वृक्षतोड सॉमीलच्या पथ्थ्यावर

By admin | Updated: December 23, 2015 23:58 IST

शिरीष शिंदे , बीड एक वृक्ष लागवड करुन त्याच्या संगोपणास कमीत कमी १०० वर्षांचा कालावधी लागतो मात्र धुळे-सोलापुर महामार्गावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु झाले असून

शिरीष शिंदे , बीडएक वृक्ष लागवड करुन त्याच्या संगोपणास कमीत कमी १०० वर्षांचा कालावधी लागतो मात्र धुळे-सोलापुर महामार्गावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु झाले असून या मार्गावर अडसर ठरणाऱ्या जुन्या वृक्षांची तोड झाली आहे. विकास कामाच्या नावाखाली गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्गावरील लहान-मोठी अशी एकुण दोन हजार तिनशे दोन वृक्षांची कत्तल केल्याची धक्कादायकबाब समोर आली असून, ही वृक्षतोड सॉ मील चालकांच्या पथ्थ्यावर पडली आहे.राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्यानंतर या मार्गावरील वृक्ष कामासाठी अडसर ठरली. त्यामुळे फोरलेनच्या कामाचे कंत्राट ज्यांना मंजुर झाले आहे त्यांनी शासनाची रितसर परवानगी घेऊन वृक्ष व झाडे तोडण्याचा मार्ग सुकर करुन घेतला. कंत्राटदार कंपनी स्वत: वृक्ष व झाडे तोडण्याचे काम करु शकत नसल्याने बीड व गेवराई तालुक्यातील सॉमील धारकांना सदरील वृक्ष तोडण्यास सांगितले.त्यानुसार सहा महिन्याच्या कालावधीत एकुण दोन हजार तिनशे दोन वृक्ष तोडण्यात आली आहेत. विकास कामाच्या नावाखाली निर्सगाचा ऱ्हास होत चालला होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील शहरी भागांचे विस्तारीकरण होत असल्याने नियम धाब्यावर बसवून झाडे सर्रासपणे तोडली जात आहे. त्यामुळे शहरी भागात झाडांची संख्या फारशी नाही. हा देखील विकासाचा भाग आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गावरील १५० वर्षाहून अधिक जुनाट वृक्षांची तोड केली जात आहे. पहायला गेले तर ही फार गंभीर बाब आहे. झाडांचे महत्व समजेनानिर्सगाचा समतोल बिघडत चालल्याने अख्या मराठवाड्याला दृृष्काळाशी सामना करावा लागत आहे. ग्लोबल वार्मिंगची चर्चा पुर्वी जागतीक स्तरावर व्हायची मात्र आता याचे परिणाम ग्रामीण भागातही दुष्काळ स्वरुपात पहावयास मिळत आहेत. औद्यागिकीकरण झपाट्याने वाढले आहे मात्र निर्सगाकडे सर्वांची डोळेझाक केली जात असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत मात्र भविष्यात पाणी मिळणेही कठीण होईल याची अनेकांना जाण नाही.