परळी : तालुक्यातील धारावती तांडा परिसरात ग्रामीण पोलीसांनी बुधवारी छापा सत्र राबवून ४ ठिकाणी गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांना थर्टी फस्र्टपूर्वीच दणका बसला आहे. अवैध दारूमुळे धारावती तांडा मागील काही महिन्यांपासून पोलिसांच्या रडारवर आहे. बुधवारी केलेल्या कारवाईदरम्यान एका ठिकाणी चारशे लिटर दारुची रसायने उध्दवस्त केली. तर दुसर्या ठिकाणी सहाशे लिटर, तिसर्या ठिकाणी तिनशे लिटर व चौथ्या ठिकाणी पाचशे लिटर दारुचे रसायने उध्दवस्त केली. एकूण ३६ हजार रुपये किमतीचे हे दारुचे रसायन व साहित्य मोडून काढले. निरीक्षक रामकृष्ण चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रताप वाळके, राजाराम राऊत, अनंद होळंबे, जिवराज फुóो, सहायक निरीक्षक केंद्रे, यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी काळूबाई राठोड, गवळणबाई पवार, कमलाकर पवार, वैजनाथ पवार, उत्तम राठोड (सर्व रा. धारावती तांडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर) |