घाणेगावात माजी सैनिकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:52 IST2019-06-03T22:52:01+5:302019-06-03T22:52:14+5:30

घराच्या बांधकामावरुन सेवानिवृत्त माजी सैनिकास मारहाण करणाऱ्या तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The former soldier was assaulted in Dhangaon | घाणेगावात माजी सैनिकाला मारहाण

घाणेगावात माजी सैनिकाला मारहाण

वाळूज महानगर : घराच्या बांधकामावरुन सेवानिवृत्त माजी सैनिकास मारहाण करणाऱ्या तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आसाराम कोंडीराम काळवणे (७६) हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. आसाराम काळवणे यांचे गावात जुने घर असून त्याची दूरुस्ती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. घराची दुरुस्ती करण्यासाठी काळवणे यांनी वाळू घराजवळ टाकली होती.

दरम्यान, शनिवार सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास आसाराम काळवणे व त्यांच्या पत्नी शंकुतला यांच्यासोबत दत्तु सोनवणे व त्याच्या वडीलांनी वाद सुरु केला. यावेळी आसाराम यांना मारहाण करण्यात आली.

त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातुन सुट्टी झाल्यानंतर आसाराम काळवणे यांनी रविवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन मारहाण करणाºया तिघा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The former soldier was assaulted in Dhangaon