माजी सरपंचासह दोघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 19, 2015 00:22 IST2015-11-19T00:12:02+5:302015-11-19T00:22:57+5:30
तामलवाडी : जमीन मालकाच्या जागी अन्य व्यक्तीस उभे करून जमिनीचे खरेदीखत करून घेतल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील माजी

माजी सरपंचासह दोघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल
तामलवाडी : जमीन मालकाच्या जागी अन्य व्यक्तीस उभे करून जमिनीचे खरेदीखत करून घेतल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील माजी सरपंचासह अन्य एका व्यक्तीविरूध्द तामलवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खडकी येथील मच्छिंद्र राऊत व गोरख राऊत या दोघा भावांच्या नावे १ हेक्टर ४८ आर इतकी जमीन होती. या दोघा भावंडापैकी मच्छिंद्र हा व्यवसायानिमित्त मागील २० ते २५ वर्षापासून गोवा राज्यात राहत होता. दरम्यान, ३० आॅक्टोबर २००९ रोजी खडकीचे माजी सरपंच नामदेव मुकाम मनसावले याने गोरख राऊत यास सोबत घेऊन मच्छिंद्र राऊत याच्या जागेवर विनायक नामदेव ढाले यास उभे करून सदरील जमीन स्वत:च्या नावे करून घेतली.
मच्छिंद्र रघुनाथ राऊत (रा. खडकी) हे दिवाळीनिमित्त गावाकडे आले असता, जमीन खरेदीचा हा व्यवहार उघडकीस आला. तर यातील गोरख रघुनाथ राऊत सध्या मयत आहे. याप्रकरणी मच्छिंद्र रघुनाथ राऊत (रा. खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तामलवाडी पोलीस ठाण्यात खडकीचे माजी सरपंच नामदेव मुकाम मनसावले व विनायक नामदेव ढाले (सर्व रा. खडकी) यांचेविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ४३८, ४७१ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि मिर्झा बेग हे करीत आहेत. (वार्ताहर)