शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

कॉँग्रेसने औरंगाबाद पूर्वमधून दिला नवा चेहरा; माजी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुखांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 12:44 IST

विशेष म्हणजे, सेवानिवृत्ती कार्यक्रमात एम. के. देशमुख यांची लोकप्रियता पाहून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले होते.

छत्रपती संभाजीनगर : माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख शिक्षणक्षेत्रानंतर आता राजकारणातील आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. कॉँग्रेसच्या दुसऱ्या यादीत औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पूर्व मतदार संघात भाजपाचे मंत्री आणि तिसऱ्यावेळी उमेदवारी मिळालेले अतुल सावे, वंचितचे विकास रावसाहेब दांडगे यांच्या विरोधात देशमुख मैदानात उतरले आहेत. एमआयएमने येथून अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नाही. पूर्व मतदारसंघात मागील दोन विधानसभेत अत्यंत चुरसीच्या लढतीत भाजपाच्या सावे यांनी बाजी मारली होती.

सेवानिवृत्ती कार्यक्रमात एम. के. देशमुख यांची लोकप्रियता पाहून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले तसे देशमुख यांनी 'बदल हवा, तर चेहरा नवा' असा नारा देत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडणूक दावा दाखल केला. येथे मुस्लिम मते अधिक असल्याने कॉँग्रेसने यावेळी मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी जोर धरत होती. अखेर कॉँग्रेसने दुसऱ्या यादीत नवीन उमेदवार देत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे, त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात भाजपा मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील देशमुख यांना राजकारणात येण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आज सावे यांच्या विरोधातच देशमुख निवडणूक लढत आहेत. 

कोण आहेत एम. के. देशमुख?गरिबीवर मात करत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत एम. के. देशमुख यांनी सुरुवातीला एका दुर्गम खेड्यात शिक्षकाची केलेली नोकरी केली. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षांत सातत्याने यश मिळवत  देशमुख शिक्षणाधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगरमधून निवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रात एक कर्तव्यदक्ष अधिकारी राहिलेले एम. के. देशमुख यांनी आपल्या कार्यशैलीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वांच्याच मनात घर केले. त्यांच्या सेवापूर्ती समारंभात मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि नांदेडपासून नाशिकपर्यंत शिक्षण विभागातील आजी- माजी वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, संस्थाचालक एवढेच नव्हे, तर मंत्रालयातील अधिकारी, जिल्हा परिषदेचे आजी- माजी अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

सर्वपक्षीय नेत्यांचे राजकारणात मदतीचे आश्वासन देशमुख यांच्या सेवापूर्ती समारंभात सर्वच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी त्यांची लोकप्रियता पाहून सुरुवातीलाच ‘तुम्ही चिखली मतदारसंघातून घड्याळावर निवडणूक लढवा’, असे सूचवत छत्रपती संभाजीनगर विभागात स्पर्धक नको, अशी सावध भूमिका घेतली. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे यांनी हातावरच घड्याळ बांधावे लागते, तुम्ही या, सहकार्य करू’ अशी मिश्कील टिप्पणी केली. तत्पूर्वी, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे आणि हरिभाऊ बागडे यांनीही ‘राजकीय क्षेत्रात येत असाल, तर बिनशर्त सहकार्य करू,’ असा विश्वास दिला होता. आता खरोखरच देशमुख निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे कोणता नेता दिलेला शब्द पाळतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAtul Saveअतुल सावेcongressकाँग्रेस