शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बोगीची होणार पुन्हा तपासणी

By admin | Updated: December 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्थानकादरम्यान लागलेल्या आगीचे नेमके कारण घटनेच्या दीड महिन्यानंतरही स्पष्ट झालेले नाही.

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्थानकादरम्यान लागलेल्या आगीचे नेमके कारण घटनेच्या दीड महिन्यानंतरही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे रेल्वेकडून या प्रकरणाचा पहिल्यापासून तपास केला जाणार आहे. यासाठी रेल्वे बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडूनही पुन्हा तपासणी करण्याचा विचार केला जात आहे.या पॅसेंजरला २५ आॅक्टोबर रोजी रात्री आग लागून एक अख्खी बोगी जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध शक्यतांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. शिवाय घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी जळालेल्या बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडून तपासणी केली. यासाठी फॉरेन्सिक पथकाकडून जळालेल्या बोगीतून विविध नमुने गोळा करण्यात आले. शॉर्टसर्किट, ब्रेक लायनरमधील तांत्रिक दोष या बाबी घटनेला कारणीभूत नसून फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले; परंतु तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोणताही ज्वलनशील पदार्थ नसल्याचा अहवाल फॉरेन्सिककडून मिळाला. त्यामुळे आगीच्या कारणाचे गूढ आणखी वाढले. घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली चार अधिकाऱ्यांची समिती अद्यापही अंतिम निर्णयापर्यंत आली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेची सुरुवातीपासून चौकशी करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर येत असल्याचे दिसत आहे. या ‘द बर्निंग ट्रेन’चे रहस्य दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत असून ते कधी उलगडणार हा प्रश्न आहे.