परभणीत पाऊस
By Admin | Updated: September 14, 2014 23:38 IST2014-09-14T23:25:22+5:302014-09-14T23:38:19+5:30
परभणी: परभणी शहर व परिसरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.

परभणीत पाऊस
परभणी: परभणी शहर व परिसरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.
रविवारी सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास हा पाऊस सुरु झाला. तब्बल २० ते २५ मिनिटे हा पाऊस झाला. शहरातील कच्छी लाईन, भाजीमंडई, सुभाषरोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. परिणामी वाहनचालकांना पाण्यातून आपली वाहने चालवावी लागली.(प्रतिनिधी)