बजाजनगरात फूटपाथ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:45+5:302021-02-05T04:10:45+5:30
उद्योगनगरीतून ट्रकचा क्लिनर बेपत्ता वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत माल भरण्यासाठी आलेला ट्रकचा क्लिनर बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज ...

बजाजनगरात फूटपाथ गायब
उद्योगनगरीतून ट्रकचा क्लिनर बेपत्ता
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत माल भरण्यासाठी आलेला ट्रकचा क्लिनर बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. आबीद आमीर जान (२२ रा.वसुदर्गा, कनार्क) हा क्लिनर म्हणून काम करतो.बुधवारी सकाळी ११ वाजता आबीद याने मी झाडाखाली बसतो, असे सांगितल्याने ट्रकखाली उतरला होता. कंपनीतून माल भरल्यानंतर ट्रकचालक बसवराज रुद्रअप्पा यास आबीद हा दिसून न आल्याने त्यांनी आबीद बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
------------------------
वैष्णोदेवी उद्यानाजवळ खड्डे
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील वैष्णोदेवी उद्यानाजवळ मोठाले खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर जवळपास एक ते दीड फुटाचे खड्डे पडले असून कंपन्यातून वाहणारे सांडपाणी या खड्ड्यात साचत असते. या रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.
------------------
वाळूजला बेशिस्त वाहतूक
वाळूज महानगर : वाळूजच्या जिल्हा परिषद शाळेसमोर रिक्षांचा थांबा असून या ठिकाणी रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करीत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. अॅपे व रिक्षा चालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करुन प्रवाशांसोबत झोंबाझोंबी करीत असतात. परिणामी या मुख्य रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत असून किरकोळ स्वरुपाचे अपघातही घडत आहे.
----------------------
पंढरपूरच्या भाजी मंडईत अस्वच्छता
वाळूज महानगर : पंढरपूरच्या भाजी मंडईत विक्रेते भाजीपाला उघड्यावर टाकत असल्याने अस्वच्छता पसरत आहे. अनेक भाजी विक्रेते टाकाऊ भाजीपाला रस्ता दुभाजक व उघड्यावर टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या टाकाऊ भाजीपाल्यामुळे मोकाट जनावरांचा भाजी मंडईत वावर वाढला आहे. अस्वच्छता पसरविणाऱ्या विक्रेत्यांविरुध्द कारवाई करण्यास ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
------------------------------