शेततळ्यावर फुलविली बाग
By Admin | Updated: August 4, 2014 00:52 IST2014-08-04T00:46:48+5:302014-08-04T00:52:50+5:30
संगमेश्वर करंजे, निटूर येथील एका शेतकऱ्याने शेततळ्याच्या सहाय्याने पाणीटंचाईवर मात करीत आंब्याची फळबाग फुलविली आहे़ त्यामुळे शेततळ्याचे महत्त्व दिसून येत आहे़

शेततळ्यावर फुलविली बाग
संगमेश्वर करंजे, निटूर
येथील एका शेतकऱ्याने शेततळ्याच्या सहाय्याने पाणीटंचाईवर मात करीत आंब्याची फळबाग फुलविली आहे़ त्यामुळे शेततळ्याचे महत्त्व दिसून येत आहे़
निटूर येथील पंकज कुलकर्णी यांची गावालगतच १६ एकर कोरडवाहू शेती आहे़ त्यांनी शेतामध्ये दोन बोअर घेतले़ परंतु, निराशा झाली़ त्यामुळे त्यांनी शेततळ्याचा प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल केला़ त्यानुसार सन २०१२-१३ मध्ये ४ लाख ८० हजार रूपये मंजूर करण्यात झाले़ त्यांनी ४१ बाय ४१ मीटर लांब व रूंदी जमीन खोदली़ खोली ५ मीटर आहे़ पावसाचे पडलेले पाणी जिरपू नये म्हणून ५०० मायक्रॉन जाडीचे पॉलिथिन अंथरले़ या शेततळ्यात ८ हजार घनमीटर पाणी साठण्याची क्षमता आहे़
तसेच त्यांनी शेतीपासून १८०० फुट अंतरावर असलेल्या ओढामध्ये एक बांध तयार घातला़ पाईपलाईनद्वारे हे पाणी शेततळ्यात आणले़ या पाण्याच्या आधारावर त्यांनी आंब्याची बाग लावली असून ती आता जोमाने फुलू लागली आहे़ त्यामुळे हा नवीन प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़