शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

चारा वाहतुकीस जिल्ह्याबाहेर बंदी

By admin | Updated: November 6, 2014 01:34 IST

जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले

जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले आहेत. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जालना तहसील कार्यालयात संभाव्य टंचाई आढावा बैठक घेतली.यावर्षी जिल्ह्यात अपेक्षित सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत लघू तसेच मध्यम प्रकल्पांत १७ टक्केच पाणीसाठा आहे. ६४ पैकी ५ प्रकल्प कोरडेठाक आहेत. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे अनेक गावात पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात बहुतांश गावांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागेल अशी भीती सर्वदूर व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याने भीषण दुष्काळ अनुभवला होता. यंदाही तिच परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे. विशेषत: जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. विहिरी व कूपनलिकांमधील पाणी पातळी घटली आहे. यामुळे रबी पेरणीही धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत पशुधनही कमी झाले आहे. फेबु्रवारीपर्यंत पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी केली असून त्यांनी याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी काढले.संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर पूर्वनियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी नायक यांनी आज सकाळी जालना तालुक्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेतला. यानिमित्त येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा, तहसीलदार रेवननाथ लबडे यांची उपस्थिती होती.सर्व जलसाठ्यांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना बंद पडल्या, त्या सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे वीजपुरवठ्याच्या अडचणीमुळे ज्या योजना बंद आहेत, त्याबाबत महावितरणने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ७ मध्यम तर ५७ लघू प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांत २६ टक्के तर लघू मध्ये १४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी मध्यम मध्ये २ नोव्हेंबर २०१३ पर्यंत ५९ तर लघू मध्ये ४६ टक्के पाणीसाठा होता. सध्या सर्व प्रकल्प मिळून केवळ १७ टक्के पाणी आहे. ५७ लघू प्रकल्पांपैकी ४ कोरडेठाक तर तब्बल २४ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याच्याखाली आहे. ४जिल्हाधिकारी नायक हे स्वत: संभाव्य टंचाईसंदर्भात तालुकानिहाय आढावा बैठका घेणार असून त्यात तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.