सिल्लोड येथे अॅपेरिक्षा आणि दुचाकी अपघातात पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 19:33 IST2020-02-12T19:32:25+5:302020-02-12T19:33:14+5:30
गंभीर जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

सिल्लोड येथे अॅपेरिक्षा आणि दुचाकी अपघातात पाच जखमी
सिल्लोड: प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षा आणि भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीचा बुधवारी दुपारी अपघात झाला. यात पाच प्रवासी जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन दिवसापूर्वीच माणिक नगर येथे भरधाव वाहने चालविल्यामुळे अपघात होऊन जीवित हानी झाली होती .
याबाबत अधिक माहिती अशी की, तांडाबाजार येथून एक अॅपेरिक्षा ( क्र. एम एच २० टी ३७९३ ) प्रवासी घेऊन सिल्लोडकडे जात होता. दरम्यान, भरधाव वेगाने औरंगाबादकडे जाणारी एक दुचाकी ( क्र. एम एच २० डी पी ३२४७) आणि अॅपेरिक्षा धडक झाली. अपघातात रिक्षामधील गुलाब सुलेमान शेख (५०), नजमा नवाज शेख (५०), रेश्मा गुलाब शेख (४०), मुबैस अजमत शेख (७) सर्व रा.तांडा बाजार ता.सिल्लोड आणि एक अनोळखी इसम जखमी झाले आहेत. यातील गुलाब शेख आणि अनोळखी इसमाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.