शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी मुलाच्या उपचारार्थ खर्च केले दीड लाख

By admin | Updated: January 4, 2016 00:12 IST

बीड : पैशासाठी भाऊ भावाचा खून करीत आहे. धावत्या जगात माणुसकी गोठत चालली आहे; मात्र अशा बदलत्या परिस्थितीतही बीड येथील मजहरखान हबीबखान यांनी

बीड : पैशासाठी भाऊ भावाचा खून करीत आहे. धावत्या जगात माणुसकी गोठत चालली आहे; मात्र अशा बदलत्या परिस्थितीतही बीड येथील मजहरखान हबीबखान यांनी एका अनोळखी जखमी मुलास वाचविण्यासाठी तब्बल वीस दिवस स्वत:च्या खिशातून दीड लाख रुपये खर्च केले. त्यांच्या या आदर्श कृतीतून माणुसकीचे दर्शन दिसून आले.वायबटवाडी (ता. बीड) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा शंकर बोराळे हा अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडला होता. तो गंभीर जखमी असल्याची बाब रस्त्यावरून जाणाऱ्या मजहरखान हबीबखान यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मित्रांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने त्याची प्रकृती गंभीर होत होती. त्यामुळे मजहरखान यांनी शंकरला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. शंकरचा हात तुटला होता. त्याचे लिव्हर पूर्णपणे डॅमेज झाले होते. त्या मुलाचे दोन आॅपरेशन करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मजहरखान यांनी मित्रांकडून काही पैसे घेऊन व स्वत:चे असे मिळून एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा भरणा केला. त्यांच्या सत्कार्याला नियतीने साथ दिली व शंकरचे जीवन वाचले.ऊसतोड मजूर कुटुंबाकडे खाजगी दवाखान्यासाठी द्यायला पैसे नव्हते. अशा परिस्थितीत मजहरखान यांनी पुढाकार घेतला. जाती-धर्माचा विचार न करता मजहरखान यांनी शंकरचे वेळेवर धावून प्राण तर वाचविलेच; शिवाय खाजगी दवाखान्याचा खर्चही उचलला. (प्रतिनिधी)