पर्यटन सुरु झाले; पहिल्या दिवशी फ्रान्सच्या एका आणि ३५९ भारतीय पर्यटकांची वेरूळ लेणीस भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 19:31 IST2020-12-10T19:30:00+5:302020-12-10T19:31:28+5:30
जगप्रसिध्द वेरूळ लेणी गेल्या आठ महिन्यापासून बंद

पर्यटन सुरु झाले; पहिल्या दिवशी फ्रान्सच्या एका आणि ३५९ भारतीय पर्यटकांची वेरूळ लेणीस भेट
खुलताबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास आठ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिध्द वेरूळ लेणी गुरुवारपासून खुली झाली. ऑनलाईन नोंदणीनंतरच प्रवेश मिळत असल्याने काही प्रमाणात पर्यटकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दिवसभरात 359 भारतीय आणि फ्रान्सच्या एका पर्यटकाने लेणी पाहिली.
जगप्रसिध्द वेरूळ लेणी गेल्या आठ महिन्यापासून बंद असल्याने 50 च्या आसपास हॉटेल , लॉज तसेच तीनशेच्या आसपास हॉकर्स, विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांनी रोजंदारीवर शेतीमध्ये काम केले. आजपासून लेण्या सुरू झाल्याने बंद पडलेले अर्थचक्र सुरु झाले आहे. मात्र, लेणी पाहण्यासाठी सकाळी हजार व दुपारी हजार अशा दोन हजार ऑनलाईन नोंदणी केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या अटीमुळे पर्यटक आणि व्यवसायिकांमध्ये नाराजी आहे.
पर्यटकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत
वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांचे जायन्टंस ग्रूप आँफ खुलताबादच्या वतीने राजेंद्र चव्हाण , दिनेश सावजी ,अध्यक्ष. जफरखान पठाण , सतीश कोळी, राजेभाऊ वायाळ, सुनील मरकड यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.