शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चंदन सावरगावात आगीचे तांडव

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

केज : तालुक्यातील चंदनसावरगाव येथे रविवारी शेतवस्तीवर रणरणत्या उन्हात अग्नितांडव निर्माण झाले. एका गोठ्यासह कडब्याच्या तीन गंजी भस्मसात झाल्या.

केज : तालुक्यातील चंदनसावरगाव येथे रविवारी शेतवस्तीवर रणरणत्या उन्हात अग्नितांडव निर्माण झाले. एका गोठ्यासह कडब्याच्या तीन गंजी भस्मसात झाल्या. दोन म्हशी भाजल्या आहेत. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास श्रीकिसन तपसे यांच्या गोठ्याने पेट घेतला. गोठ्यातील शेतीउपयोगी साहित्याची आगीत राख झाली. गोठ्यात दोन म्हशी बांधलेल्या होत्या. आगीचे लोट त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्या भाजल्या आहेत. त्यानंतर आग लगत असलेल्या कडब्याच्या गंजीजवळ गेली. बाबासाहेब तपसे व पांडुरंग तपसे यांच्या गंजींनाही आगीने कवेत घेतले. यावेळी कापसाच्या पळाट्या व भुसकटही जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धावधाव केली; पण आगीच्या ज्वाला इतक्या वेगाने फैलावत होत्या की, नागरिकांचे प्रयत्न अपुरे ठरले. अंबाजोगाई पालिकेचा बंब घटनास्थळी पोहोचल्यावर तासाभराच्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली. जेथे आग लागली तेथे २५ घरांची वस्ती आहे; आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. घटनास्थळी मंडळ अधिकारी एम. ए. सोनवणे, तलाठी एस. एल. कराड, पशूधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा राऊत यांनी भेट दिली. डॉ. राऊत यांनी म्हशींची तपासणी करुन उपचार केले. (वार्ताहर) लग्नकार्यावर सावट श्रीकिसन तपसे यांचे गावात घर असून शेतात गोठा आहे. पाणीटंचाईमुळे ते गेल्या काही दिवसांपूर्वी शेतात राहण्यासाठी गेले. त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा सोमवारी आहे. रविवारपासूनच नातेवाईकांची रेलचेल होती. राहत्या घरापासून जवळच असलेल्या गोठ्याने पेट घेतला. त्यामुळे नातेवाईकांची धांदल उडाली. कन्येच्या लग्नाच्या पूर्वसंध्येलाच आगीने तांडव निर्माण केले. त्यामुळे लग्नसोहळ्यावरही दु:खाचे सावट निर्माण झाले आहे.