शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बजाजनगरमध्ये ईएसआयसी दवाखान्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:22 IST

राज्य कामगार विमा योजना सेवेच्या दवाखान्याला (ईएसआय) शनिवारी पहाटे अचानक आग लागली. यात रेकॉर्ड रूमधील संगणकासह कागदपत्रे व इतर साहित्य भस्मसात झाले आहे.

वाळूज महानगर : बजाजनगरातील राज्य कामगार विमा योजना सेवेच्या दवाखान्याला (ईएसआय) शनिवारी पहाटे अचानक आग लागली. यात रेकॉर्ड रूमधील संगणकासह कागदपत्रे व इतर साहित्य भस्मसात झाले आहे. ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने मुंबईतील घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज दवाखाना प्रशासनाने केला आहे. या घटनेमुळे कामगार रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आणि अल्प दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआयसी प्रशासनाने बजाजनगरमध्ये ईएसआयसी दवाखाना सुरू केला; पण आजघडीला या इमारतीच्या भिंती व छताला भेगा पडल्या आहेत. याठिकाणी दररोज शेकडो कामगार व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी ये-जा करतात. शुक्रवारी रात्री दवाखाना बंद करून कर्मचारी घरी गेले होते. शनिवारी पहाटे ५.३० ते ६.०० वाजेच्या सुमारास बाजूच्या एका खाजगी अकॅडमीची मुले व्यायामासाठी जात असताना त्यांना दखान्यातून धूर येत असल्याचे दिसले. मुलांनी खालच्या बाजूस असलेल्या मेडिकलच्या मालकास उठवून घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन केंद्राला देत ईएसआयसीच्या आरएमओ अंजली बनसोड यांना कळविले. अग्निशमन जवानांनी घटनास्थळ गाठत सुरुवातीला दवाखान्याचा वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर दरवाजा तोडून पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. अर्ध्या तासानंतर आग विझविण्यात जवानांना यश आले. दरम्यान, ईएसआयसीचे विभागीय उपसंचालक संजीव यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक भोसले, डॉ. पृथ्वीराज राठोड यांनी दवाखान्याची पाहणी केली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे इतरत्र आग पसरली नाही. यात सुदैवाने संभाव्य वित्तहानी टळली.

संगणकासह इतर साहित्य खाकआगीत कार्यालयीन अभिलेखे, जवळपास १०० कामगारांची वैद्यकीय खर्चप्रतिपूर्तीची देयके, दोन संगणक, दोन प्रिंटर्स, राऊटर, दोन टेबल, एक फॅन, दोन खुर्च्या, दोन कपाट, केबल वायरिंग, टीव्ही संच, तसेच इतर कार्यालयीन व रुग्णाच्या नोंदी असलेली कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. यात जवळपास एक ते दीड लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा दावा ईएसआयसी प्रशासनाने केला आहे.संलग्नित रुग्णालयात व्यवस्थादवाखान्याला आग लागल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील चार संलग्नित रुग्णालयांत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर या दवाखान्याचे लवकरच पंढरपुरातील महावीर चौकालगत एका इमारतीत स्थलांतर करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी पृथ्वीराज राठोड यांनी सांगितले.

‘लोकमत’चे भाकीत खरे ठरले‘लोकमत’ने बजाजनगरातील ईएसआयसी दवाखान्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, तसेच दवाखान्यातील वीजपुरवठा करणाऱ्या वायरिंग उघड्या व लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याने आग लागण्याची शक्यता वर्तविली होती. शनिवारी दवाखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘लोकमत’ने वर्तविलेले भाकीत खरे ठरले आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद