छावणी परिसरात भीषण आगीत चार दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 08:42 IST2019-02-09T08:36:44+5:302019-02-09T08:42:28+5:30

शॉर्ट सर्किट ने लागली आग

A fire broke out in four shops in the chhawani area | छावणी परिसरात भीषण आगीत चार दुकाने जळून खाक

छावणी परिसरात भीषण आगीत चार दुकाने जळून खाक

औरंगाबाद: छावणी परिसरातल्या होली क्रॉस हायस्कूलच्या पाठीमागील लक्ष्मी नगर भागात रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागून चार दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाने केलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले.

लक्ष्मी नगर परिसरातल्या डेली नीड्स भंगारच्या दुकानासह पंचरच्या एका दुकानाला अचानक शॉक सर्कीटमुळे आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने पदमपुरा येथील अग्निशामक विभागाला दिली घटनास्थळावर 3 पाण्याच्या  बंबासह अग्निशमन दलाचे जवान पोहोचले होते. सदरील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली होती. या मार्गावरील वाहतूक देखील पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने वळवली होती. या घटनेमध्ये भंगार दुकाने आणि पंचर जोडीचे दुकान जळून खाक झाली आहेत.

Web Title: A fire broke out in four shops in the chhawani area