महिला व बालविकास कार्यालय शोधून सापडेना

By Admin | Updated: May 24, 2014 02:05 IST2014-05-24T01:56:15+5:302014-05-24T02:05:59+5:30

अशोक कारके, औरंगाबाद महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे महिला व बालविकास कार्यालय गरजूंना सापडता सापडत नाही.

Finding women and child development office | महिला व बालविकास कार्यालय शोधून सापडेना

महिला व बालविकास कार्यालय शोधून सापडेना

अशोक कारके, औरंगाबाद महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे महिला व बालविकास कार्यालय गरजूंना सापडता सापडत नाही. महिला व बालविकास कार्यालयामार्फत राबविण्यात येणार्‍या शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतून शेतकर्‍यांच्या मुलींच्या विवाहासाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेसाठी विभागाला २०१३-१४ वर्षात १०० जोडप्यांचे लक्ष्य दिले गेले होते. प्रत्यक्षात केवळ २७ जोडपीच या अनुदानाचा लाभ घेऊ शकली. त्यांना २ लाख ७० हजार रुपये अनुदान देण्यात आले. सामूहिक विवाह लावणार्‍या संस्थांना जोडप्यामागे दोन हजार रुपये दिले जातात. त्यानुसार ५४ हजार रुपये देण्यात आले आहेत. ८ लाख ७६ हजार रुपये लाभार्थी न मिळाल्याने पडून आहेत.

Web Title: Finding women and child development office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.