होर्डिंग्सवरील कारवाईला सापडेना मुहूर्त !

By Admin | Updated: November 29, 2014 00:29 IST2014-11-29T00:03:28+5:302014-11-29T00:29:47+5:30

सोमनाथ खताळ , बीड शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध होर्डींग लावून चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Finding action on hoardings! | होर्डिंग्सवरील कारवाईला सापडेना मुहूर्त !

होर्डिंग्सवरील कारवाईला सापडेना मुहूर्त !



सोमनाथ खताळ , बीड
शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध होर्डींग लावून चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यासाठी कुठलाही परवाना न घेता सर्रास होर्डींगद्वारे ‘फोकस’मध्ये येण्यासाठी धडपड सुरू आहे. हे नियमबाह्य असले तरी यावर कारवाई करण्यास पालिकेने हात आखडता घेतला असून आतापर्यंत एकही कारवाई झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
निवडणूक प्रचारासाठी लावलेली अवैध होर्डींग काढण्यासाठी प्रत्येक पालिकेने एक मोहीम राबवून ते हटवावेत असे न्यायालयाने आदेश दिले होते. हे अवैध होर्डींग काढण्याची मोहीम राबविण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने ३० सप्टेंबरला प्रत्येक पालिकेला दिले होते. पालिकेने याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. आजही अनेक ठिकाणी होर्डींग लावल्याचे दिसून येत असून यावर कारवाई करण्यासाठी पालिका का धजत नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.
पालिकेने होर्र्डींग लावण्यासाठी सातारा येथील राहुल कदम यांना ५ लाख ८० हजार रूपये एवढी रक्कम घेऊन ठेका दिला आहे. याची मुदत ३१ मार्च २०१५ पर्यंत असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात ना या ठेकेदाराचे ऐकले जाते ना पालिकेचे. सर्रास आपलीच ‘दादा’गिरी करीत सार्वजनिक तसेच वाहतुकीस, रस्त्यांवर अवैध होर्डींग लावले जात आहेत. त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.
पथक सुस्त
बीड पालिकेच्या वतीने अवैध होर्डींगवर कारवाया करण्यासाठी तीन झोनमध्ये तीन स्वच्छता निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलेले आहे.यामध्ये स्वच्छता निरीक्षक युवराज कदम, तिडके, जोगदंड यांचा समावेश आहे. मात्र कदम म्हणाले शहरात कोठेच अवैध होर्डींग नाही. जे आहेत ते ठेकेदारामार्फत लावले गेलेले आहेत. पालिकेच्या रस्त्यावरील होर्डींगवर आम्ही कारवाया करतो. त्यात काय विशेष हे तर रूटींगचे काम आहे़
होर्डिंग्स हटवणार
शहरातील सर्वच होर्डींग हटल्याशिवाय दुसरे होर्डींग लावायला परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.४
बीड शहरात पालिकेच्या वतीने २४ ठिकाणी होर्डींग लावण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र हे ठिकाण सोडून आपला मनमानी कारभार चालवत राजकीय नेते व स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते समजणारे होर्डींग लावून ‘फोकस’मध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Finding action on hoardings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.