अखेर १५२ कोटींच्या निविदा प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:22 IST2017-10-04T01:22:41+5:302017-10-04T01:22:41+5:30
शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने १०० कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. या निधीत ३१ रस्ते गुळगुळीत करण्यात येतील.

अखेर १५२ कोटींच्या निविदा प्रसिद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने १०० कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. या निधीत ३१ रस्ते गुळगुळीत करण्यात येतील. यासंबंधीची निविदा मंगळवारी महापालिकेने प्रसिद्ध केली. शासन अनुदानाची कामे करणाºया कंत्राटदारांनी डिफर पेमेंटच्या माध्यमाने ५२ कोटींत अतिरिक्त रस्त्यांची कामे करावीत, अशी गळ घालण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेला राज्य शासनाने जून महिन्यात शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. रस्त्यांची यादी तयार करणे, किती निविदा काढाव्यात यावरून तीन महिन्यांपासून वाद सुरू होता.