शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आरक्षण उठविण्याचा, पदोन्नतीचा ‘तो’ ठराव रद्द

By admin | Updated: December 23, 2014 00:58 IST

औरंगाबाद : महापालिका व शहरात मागील पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या दोन वादग्रस्त विषयांवर आज सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला

 

औरंगाबाद : महापालिका व शहरात मागील पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या दोन वादग्रस्त विषयांवर आज सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. क्रांतीचौक येथील आरक्षित भूखंड क्रमांक १७३५५ वरील आरक्षण उठविण्याचा ठराव रद्द करण्यात आला. तसेच कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांना सहायक संचालक नगररचना या पदावर पदोन्नतीचा ठराव रद्द करण्याचे आदेश महापौर कला ओझा यांनी दिले. ते दोन विषय वगळता बाकीच्या इतिवृत्तास मंजुरी देत महापौरांनी विषयपत्रिका चर्चेला येण्यापूर्वीच सभा तहकूब केली. २७ डिसेंबरपर्यंत ही तहकूब सभा घेण्यात येणार आहे. सभा संपल्याचे महापौरांनी राष्ट्रगीत न घेताच जाहीर केले. त्यामुळे सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. नगरसचिव एम. ए. पठाण यांनी सभा तहकूब केल्याचे १० मिनिटांनी जाहीर केले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेत आता सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सभेत मनमानी केल्यामुळे शिवसेनेवर भाजपासह सर्वच पक्षांनी टीकास्त्र सोडले. ४ क्रांतीचौक येथील नगर भूमापन क्रमांक १७३५५ या मिळकतीवर २००२ च्या सुधारित विकास आराखड्यानुसार पार्किंग, उद्यानाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. ते आरक्षण उठविण्याचे, तसेच सहा. संचालक या पदावर डी. पी. कुलकर्णी यांना पदोन्नती देण्याच्या ठरावाचे इतिवृत्त क्र.६६५, ६६६ वर होते. ते दोन्ही ठराव वगळून इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. ४११ नोव्हेंबरच्या सभेत वरील दोन्ही ठराव ऐनवेळी घुसवून मंजूर करण्यात आले होते. क्रांतीचौकच्या जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी सूचक सूर्यकांत जायभाये, अशोक बेहडे, सभापती विजय वाघचौरे यांनी ठराव रद्द करण्यासाठी महापौरांना पत्र दिले आहे. कुलकर्णी यांचा ठराव राजू वैद्य, समीर राजूरकर यांनी मांडला होता. १ महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्याकडे मनपाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही सभापूर्व बैठका घेऊन त्यांनी रणनीती आखली. मात्र, त्याचा काहीही परिणाम सभेच्या कामकाजावर झाला नाही. पक्षप्रमुख ठाकरे यांनी जैस्वालांकडे मनपाची सूत्रे दिलेली असताना उपनेत्यांची मनपा सभेवर पकड कायम असल्याचे स्पष्ट झाले. २ कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांना पदोन्नती देण्यास खा.चंद्रकांत खैरे यांचा विरोध होता. कारण त्यांनी कुलकर्णी यांची १०० पानी तक्रार गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. क्रांतीचौक येथील आरक्षित भूखंड प्रकरणात अपेक्षित अर्थकारण झाले नाही. त्यामुळे तो ठरावही रद्द करण्यासाठी दबाव आणला गेला. मुळात ते दोन्ही ठराव शिवसेनेच्या सदस्यांनी मांडले होते. परंतु अपेक्षित हेतू साध्य न झाल्यामुळे दोन्ही ठराव रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.