अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 17:40 IST2020-09-16T17:29:03+5:302020-09-16T17:40:13+5:30
प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल

अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा
औरंगाबाद : औरंगाबादकरांचीमुंबई विमानसेवची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एअर इंडियाकडून २२ सप्टेंबरपासून मुंबई- औरंगाबाद - मुंबई विमानसेवा सुरू केली जात आहे. आठवड्यातून ३ दिवस हे विमान उड्डाण घेईल, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.
निर्यातबंदीचा त्वरित परिणाम नाहीhttps://t.co/MMEmsE92Zy
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 16, 2020
आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेईल. मुंबईहून सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेऊन औरंगाबादेत सायंकाळी ७.२० वाजता दाखल होईल. रात्री ८.२० वाजता येथून उड्डाण घेईल आणि रात्री ९.३५ वाजता विमान मुंबईत पोहोचेल.
प्रवाशांना दिलासा
मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु सकाळच्या वेळेतील स्लॉट मिळाला नाही. किमान सायंकाळचे स्लॉट देण्याची मागणी करण्यात आली, ही मागणी मान्य झाली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल, अशी आशा आहे.
- सुनीत कोठारी, उद्योजक
उदयनराजेंनी मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घ्यावाhttps://t.co/o45GEUjrJj
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 16, 2020