शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

समांतर जलवाहिनीच्या अंतिम मसुद्याचे काम युद्धपातळीवर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 3:44 PM

प्रकल्पाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांची समितीही यावेळी गठित करण्यात आली.

ठळक मुद्दे समांतर जलवाहिनी कंपनीला पुन्हा काम देण्यासाठी महापालिकेत पहिली बैठक घेण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्तांसमोर समांतरचा मसुदा ठेवण्यात येईल.

औरंगाबाद :  समांतर जलवाहिनी कंपनीला पुन्हा काम देण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत पहिली बैठक घेण्यात आली. बैठकीत कंपनीने आपले भागीदार बदलण्याची मुभा द्यावी यावर सर्वाधिक भर दिला. प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाप्रमाणे कर्ज उभारण्यावर एकमत झाले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सर्वप्रथम युद्धपातळीवर करण्याचेही बैठकीत निश्चित झाले. प्रकल्पाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांची समितीही यावेळी गठित करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्तांसमोर समांतरचा मसुदा ठेवण्यात येईल.

समांतर जलवाहिनीसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या. कंपनीसोबत महापालिकेने बसून छोट्या-मोठ्या त्रुटी दूर कराव्यात, अशी सूचना पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केली होती. त्यानुसार मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी आज एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल, मनपाचे अधिकारी, समांतरच्या कंपनीचे अधिकारी विजय गुप्ता, जीवन सोनवणे उपस्थित होते. 

बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी मनपावर लादलेल्या अटी-शर्र्तींचा पाढा वाचणे सुरू केले. एसपीएमएल कंपनीसोबत असलेल्या इतर भागीदार कंपन्यांपैकी काहींना बदलण्याची मुभा द्यावी, या मुद्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्वाधिक भर दिला. मनपातर्फे सांगण्यात आले की, यासाठी राज्याच्या विधि व न्याय विभाग, तसेच सरकारी अभियोक्ता यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यांनी होकार दिल्यास मनपाकडूनही हिरवा कंदिल राहील. योजनेतील संपूर्ण वाढीव खर्च राज्य शासन देणार आहे. त्यामुळे मूळ करारानुसारच भविष्यात काम होईल.

कंपनीला थकबाकीपोटी २० कोटी रुपये त्वरित द्यावेत. मुख्य जलवाहिनीचे काम सुरू झाल्यावर, योजनेचा आढावा घेऊन रक्कम देण्यात येईल. कर्ज रोखे उभे करण्यासाठी मनपाने मदत करावी. एसपीएमएल कंपनी डबघाईस आली आहे. बाजारात कोणीच कर्ज देणार नाही, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. यावरही मनपा कोणतीही मालमत्ता अजिबात गहाण ठेवणार नाही. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने कोणती पद्धत अवलंबली त्यानुसार कंपनीने कर्ज घ्यावे, असे बजावले.

मनपा अधिकाऱ्यांची समिती समांतरची योजना राबविण्यासाठी वन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे, पुढील मसुदा तयार करणे, कंपनीच्या अटी-शर्ती तपासणे यासाठी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त डॉ. दीपक कुलकर्णी, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, मुख्य लेधाधिकारी सुरेश केंद्रे, विधि सल्लागार अपर्णा थेटे यांची समिती गठित केली. तर समांतरच्या कंपनीने मनपाला बँक गॅरंटी द्यायची आहे, ती राष्ट्रीयीकृत बँकेचीच असावी, अशी अट महापालिकेने घातलेली आहे.

योजनेचा आर्थिक डोलाराकेंद्राचा निधी- १४३ कोटी ८६ लाखराज्याचा निधी- १७ कोटी २० लाखएकूण- १६१ कोटी २० लाखमनपाने खर्च केलेली रक्कम- २१ कोटी १४ लाखशिल्लक रक्कम- १४४ कोटी ६६ लाखयोजनेच्या निधीवर व्याज- १२७ कोटी ९ लाखएकूण- २६७ कोटी २५ लाखसुरक्षा ठेव- ९४ कोटी ५० लाखसुरक्षा ठेवीवरील व्याज- ११ कोटीउपलब्ध रक्कम- ३७३ कोटी २६ लाख 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका