मतपत्रिकेचा फोटो काढणाऱ्यावर गुन्हा दाखल
By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:43+5:302020-12-03T04:10:43+5:30
सुलतानपूर येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रात दुपारी २ वाजेच्या सुमारास अरुण वसंतराव खंडागळे (रा. येसगाव नंबर ३) ...

मतपत्रिकेचा फोटो काढणाऱ्यावर गुन्हा दाखल
सुलतानपूर येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रात दुपारी २ वाजेच्या सुमारास अरुण वसंतराव खंडागळे (रा. येसगाव नंबर ३) हा मतदानासाठी गेला होता. त्याने मतदान करताना मतपत्रिकेचा फोटो मोबाईलमध्ये काढला. ही बाब केंद्राध्यक्ष डी. एम. पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी ताबडतोब सदरील मतदारास पोलिसांच्या ताब्यात दिले. गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.