फरार दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:06 IST2021-04-23T04:06:19+5:302021-04-23T04:06:19+5:30

दीड महिन्यापूर्वी ८ मार्चला रात्री नऊ वाजेच्या सुमारास गणेश पंढरी खंदारे (वय १८, रा. रांजणगाव) हा दुचाकीने जात असताना ...

Filed a case against the absconding biker | फरार दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

फरार दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

दीड महिन्यापूर्वी ८ मार्चला रात्री नऊ वाजेच्या सुमारास गणेश पंढरी खंदारे (वय १८, रा. रांजणगाव) हा दुचाकीने जात असताना स्टरलाईट कंपनीजवळ दुसऱ्या दुचाकीस्वाराने धडक देऊन फरार झाला होता. यात गंभीर जखमी गणेश खंदारे याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांदरम्यान, ९ मार्चला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गणेश खंदारे याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी मृताचा भाऊ खंदारे यांच्या तक्रारीवरून फरार दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------

जोगेश्वरीत अंतर्गत रस्त्याची दुरवस्था

वाळूज महानगर : जोगेश्वरी गावातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. गावातील न्यू आंबेडकरनगर व झोपडपट्टी परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक नागरिकांचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीस्वार घसरून पडत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून केली जात आहे.

----------------------------

पंढरपुरात पथदिवे सुरू करा

वाळूज महानगर : पंढरपुरात बंद पडलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. येथील तिरंगा चौक ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने नागरिक व वाहनधारकांना चाचपडत अंधारातून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावर विद्युत खांब उभे असून, केवळ पथदिवे बसविले जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

---------------------------------------

वाळूज महानगरात कारवाईमुळे विक्रेते त्रस्त

वाळूज महानगर : वाळूज महानगरात लॉकडाऊन काळात व्यवसाय करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने विक्रते त्रस्त झाले आहेत. सध्या प्रशासनाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अनेक विक्रेते वेळेचे बंधन पाळत नसल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Filed a case against the absconding biker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.