शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

संचिका झाल्या रंगारंग; महापालिकेच्या कारभारात ‘महसुली’ रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 7:53 PM

खाकीऐवजी संचिकांना वेगवेगळे रंग देण्याचे आयुक्तांचे आदेश 

ठळक मुद्देमनपात विभागनिहाय संचिकांचा रंग वेगवेगळा असणार आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी महसूल कामकाजाच्या धर्तीवर विविध विभागांच्या संचिकांना रंगांचे कोड देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमध्ये बस्त्यांमध्ये संचिका असतात. त्यांना विशिष्ट रंगांच्या कपड्यात गुंडाळलेले असते, तर आता मनपात विभागनिहाय संचिकांचा रंग वेगवेगळा असणार आहे. 

महापालिकेत संचिकांचा ढीग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या ढिगातील संचिका एकाच रंगाच्या असल्याचे दिसून आल्यामुळे कोणत्या विभागाची संचिका कोणती आहे हे शोधण्यात बराच कालावधी जातो. त्यामुळे आयुक्तांनी विभागनिहाय संचिका रंगीत कव्हरच्या असाव्यात याबाबत आदेश काढले आहेत. मनपाच्या तिजोरीत उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे अनेक कामांच्या संचिका तुंबल्या आहेत. त्या तुंबलेल्या संचिकांतून विभागातील कर्मचारी मर्जीतील संचिका बरोबर बाहेर काढून ती मंजूर करून आणतात. यामुळे पालिकेच्या कारभारात सुसूत्रता राहिलेली नाही. आजवर संचिकांचा रंग खाकी होता. मात्र, आता अधिकाºयांच्या टेबलवर विशिष्ट रंगांच्या संचिकाच पाहायला मिळेल.  

असे आहे अभिलेखांचे वर्गीकरणमहसूल प्रशासनात कायम बस्त्यांचा रंग लाल असतो. ३० वर्षे जुन्या बस्त्यांचा रंग हिरवा असतो. १० वर्षे जुन्या बस्त्यांचा रंग पिवळा असतो. १ ते ५ वर्षांतील बस्त्यांचा रंग पांढरा असतो. महसूलमध्ये जरी संचिका एकाच रंगाच्या असल्या तरी अभिलेखांमध्ये वर्गीकरण करताना वरील रंगांचा कपडा वापरण्यात येतो. त्याबाबतची शक्यता पडताळून आयुक्तांनी मनपात विभागनिहाय संचिकांना विविध रंगांचे कोड देण्याचे ठरविले आहे. या संचिका जेव्हा अभिलेख कक्षात जातील, तेव्हा त्या सहज उपलब्ध होतील, असा त्यामागील उद्देश असू शकतो. 

अनेक संचिका अर्धवटआयुक्त पाण्डेय यांनी संचिकांची तपासणी केली असता त्यांना अधिकारी आळशीपणाने संचिका हाताळत असल्याचे लक्षात आले आहे.संचिकांमध्ये अपूर्ण टिप्पणी लिहिणे, त्यानुसार पत्रव्यवहाराची नोंद न ठेवणे, स्वाक्षरीखाली नाव व पदनामाचा उल्लेख तारखेसह नसणे, तांत्रिक बाबींमध्ये अक्षरांची मांडणी सुरळीत न करणे, अधिकाºयांनी काय शेरा मारला आहे, हे स्पष्टपणे दिसत नाही. अशा काही नोंदी आयुक्तांनी पत्रात नमूद केल्या आहेत. 

विभागनिहाय संचिकांचे रंग असे असतीलविभागाचे नाव    संचिकांचा रंग नगररचना    फिकट निळा पाणीपुरवठा     निळा आरोग्य विभाग    लालरस्ते    पिवळा विद्युत    विटकरी कर वसुली    पोपटी ड्रेनेज    नारंगी  अग्निशमन    हिरवा घनकचरा    जांभळा महिला-    अबोली बालकल्याणएनयूएलएम        फिकट ग्रे मालमत्ता    फिकट पिवळा उद्यान         मोरपंखी पशुधन    फिकट हिरवा विधि    फिकट आकाशी शिक्षण    राणीरंग आस्थापना-१    गुलाबी आस्थापना-२    तपकिरी क्रीडा    मेहंदी सांस्कृतिक    गडद आकाशी जनसंपर्क     नेव्ही ब्ल्यू संगणक    फिकट जांभळा घरकुल    गडद ग्रे निवडणूक     पांढरा उर्वरित    खाकी  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद