किरकोळ कारणावरून १५ ते १६ तरुणांमध्ये हाणामारी

By | Updated: December 4, 2020 04:13 IST2020-12-04T04:13:00+5:302020-12-04T04:13:00+5:30

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून जालाननगर येथील उद्यानात आपसात हाणामारी करणाऱ्या ९ तरुणांवर सातारा पोलिसांनी आज गुरुवारी कारवाई केली. यात ...

Fighting between 15 to 16 youths for petty reasons | किरकोळ कारणावरून १५ ते १६ तरुणांमध्ये हाणामारी

किरकोळ कारणावरून १५ ते १६ तरुणांमध्ये हाणामारी

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून जालाननगर येथील उद्यानात आपसात हाणामारी करणाऱ्या ९ तरुणांवर सातारा पोलिसांनी आज गुरुवारी कारवाई केली. यात काही अल्पवयीन मुले आहेत. जालाननगर येथील उद्यानात तरुणांच्या दोन गटांत १ डिसेंबर रोजी जोरदार भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. ही बाब तेथील सुरक्षारक्षकाने सातारा पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत भांडण करणारे तरुण पळून गेले होते. मात्र, या हाणामारीची ‘व्हिडिओ क्लिप’ सोशल मीडियावर व्हायरल होताच गुरुवारी पोलिसांनी याविषयी हा गुन्हा दाखल करून ९ तरुणांवर कारवाई केली.

Web Title: Fighting between 15 to 16 youths for petty reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.