शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पाचही जागा बिनविरोध

By admin | Updated: January 6, 2015 01:07 IST

उमरगा : निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत उमरगा नगर परिषदेच्या प्रभाग सहाची पोटनिवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता़

उमरगा : निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत उमरगा नगर परिषदेच्या प्रभाग सहाची पोटनिवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता़ बैठकीतील सामंजस्याच्या निर्णयानंतर इतर उमेदरांनी सोमवारी आपले नामनिर्देशनपत्र परत घेतले़ त्यामुळे उर्वरित पाचही उमेदवारांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड जाहीर केली़उमरगा नगर पालिकेच्या प्रभाग सहाच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच पेटला होता़ पाच जागांसाठी २३ उमेदवारांनी २६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते़ ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत होती़ त्या पध्दतीने विविध पक्षांकडून प्रचार यंत्रणाही राबविण्यास सुरूवात झाली होती़ मात्र सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा व नागरी स्वच्छतेचा पश्न आदी मुद्द्यांमुळे उमेदवारांसह पक्षांना ही निवडणूक परवडणारी नव्हती़ त्यामुळे आमदार बसवराज पाटील, खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे प्रा़ जितेंद्र शिंदे, सुरेश बिराजदार, भाजपाचे कैलास शिंदे, बापूराव पाटील, माजी नगराध्यक्ष रज्जाक उत्तार, जितेंद्र शिंदे, विद्यमान उपनगराध्यक्ष धनंजय मुसांडे आदींची बैठक झाली़ या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्यानंतर इतरांनी आपले नामनिर्देशनपत्र वापस घेतले़ त्यानंतर दत्ता सदाशिव रोंगे (भाजपा), अत्तार वाहब रज्जाक (शिवसेना), संगिता राजेंद्र पतगे (काँग्रेस), सुनिता बळीराम सुरवसे (शिवसेना) व महानंदा मच्छिंद्र पाटील (राष्ट्रवादी) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार उत्तम सबनीस, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ़ संतोष ढेंगळे यांनी काम पाहिले़ (वार्ताहर)उमरगा पालिकेच्या राजकीय इतिहासात प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा आदी सर्वपक्षीयांनी एकत्रित बैठक घेवून निवडणूक बिनविरोध काढली आहे़ शहराच्या विकासासाठी हे राजकीय मनोमिलन मैलाचा दगड ठरणार असल्याची चर्चाही शहरात सुरू होती़नळदुर्ग : येथील प्रभाग एकमधील नगरसेवक देविदास राठोड यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत होत असल्याचे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. दिवंगत नगरसेवक देविदास राठोड यांचे पूत्र निरंजन राठोड हे राष्ट्रवादीकडून तर वैभव जाधव हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील उमरगा येथील पाच तर तुळजापूर व नळदुर्ग येथील प्रत्येकी एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. यासाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ५ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. यात उमरगा येथील पाचही जागा बिनविरोध निवडून आल्या असून, तुळजापूर आणि नळदुर्ग येथील प्रत्येकी एका जागेसाठी आता १८ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तुळजापूर : न. प. शहर हद्दवाढ प्रभाग क्रमांक पाच मधील एका सर्वसाधारण जागेसाठी नऊ उमेदवारापैकी पाच उमेदवारानी आपले अर्ज सोमवारी मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी काशीनाथ पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीचे अमर हंगरगेकर, अमोल कुतवळ अनिल राठोड, हरिष रोचकरी हे रिंगणात राहिले आहेत.