शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत झाली शंभर कोटींची उलाढाल

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

जालना : यावर्षी दीर्घ प्रतीक्षेनंतर का असेना समधानकारक पाऊस पडल्यानंतर सुखावलेल्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना यंदाची दिवाळी हर्षोल्हासात जाईल,

जालना : यावर्षी दीर्घ प्रतीक्षेनंतर का असेना समधानकारक पाऊस पडल्यानंतर सुखावलेल्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना यंदाची दिवाळी हर्षोल्हासात जाईल, असे अपेक्षित असतानाच दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचा बार उडाल्याने छोट छोट्या व्यावसायिकांसह काही चणाक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दिवाळी पूर्वीच दिवसाळी साजरी झाली. निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भाऊगर्दीने लढती बेरंग झाल्या होत्या. मातब्बरांच्यादृष्टीने त्या डोकेदु:खीच्या ठरल्या खऱ्या; परंतु या लढतीतील उलाढालीने जिल्ह्यातील छोटछोट्या व्यवसायिकांसह व्यापारी व उद्योग क्षेत्र सुखावले.शहरी व ग्रामीण भाग अक्षरश: निवडणूकमय झाला होता. कारण गेल्या पंधदा दिवसांपासून संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. येत्या चार सहा दिवसात तर हे वातावरण शिगेला पोहोचले होते. लढतींचा काय निर्णय लागेल, हा भाग निराळा; परंतु पाचही मतदारसंघात रंगलेल्या या लढती छोटछोट्या व्यवसायिकांसह व्यापारी व उद्योगक्षेत्रास दिलासादायक ठरल्या. महायुती व आघाडी संपुष्टात आली. परिणामी पाचही मतदारसंघात चार प्रमुख पक्ष परस्परांविरोधात बाह्या सरसावून उभे राहिले होते. त्यात अन्य पक्षांनी उमेदवार रिंंगणात उतरवून या लढतीत बहर आणला. त्यामुळे लढती बेरंग झाल्या; मातब्बरांच्या दृष्टीने त्या लढती क्लिस्ट व डोकेदु:खीच्या झाल्या खऱ्या; परंतु छोटछोट्या व्यावसायिकांच्या दृष्टीने या लढती दिवाळी साजरी करण्यासारख्या ठरल्या होत्या.शहरी व ग्रामीण भागातील छोटछोटे हॉटेल्स, पानटपऱ्या, ढाबे, बार कार्यकर्त्यांनी गजबजले होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चहापाण्यासह नाष्टा व व्हेज-नॉनव्हेजच्या भोजनावळींवर लाखोंचा खर्च सुरु होता. त्या गावा-गावांमधून पदयात्रा, मिरवणुका तसेच सभा, संमेलनाच्या निमित्ताने का असेना दवंडी वाजविणाऱ्यांपासून बॅण्डवाले, तडमताशावाले किंवा डिझे चालकांना सुध्दा सुगीचे दिवस आले होते. गावागावांमधील पेंटर्स, डिजिटल बॅनर्स बनविणाऱ्यांपासून छपाई करणाऱ्या छाप खान्यांवाल्यांचाही व्यवसाय वधारला होता. पाठोपाठ शामीयाने, मंडप, डेकोरेशन, खुर्च्या, टेबल्स, सतरंज्या किंवा अन्य साहित्यवाल्यांचे दिवस फळफळले होते. फुल विक्रेत्यांनाही सुगीचे दिवस आले होते. वाहन बाजार तर उलाढालीने अक्षरश: सुखावला होता.अ‍ॅटोरिक्षापासून छोटा हत्ती, व शेकडो जीप गाड्या दररोज प्रचारार्थ धावत होत्या. सभा, संमेलनानिमित्त ट्रॅक्टर्स, टेम्पो, ट्रक्स किंवा मिनीबसेसही कार्यकर्त्यांचे ताफ्याच्या ताफे घेवून धावत होते. वाहन बाजारात गेल्या पंधरा दिवसांपासून एकही वाहन कामाविना उभे नव्हते. डिझेल व पेट्रोलच्या विक्रीतसुध्दा मोठी वाढ झाली असून त्यामुळे पंपचालकही सुखावले.निवडणुकीच्या निमित्ताने किराणा, भुसार बाजारही तेजीत होता. दररोज हजारोंच्या भोजनावळ्या उठत होत्या. त्यामुळे स्वयंपाक्यांसह मजूरांच्या हातास काम मिळाले. भांडीकुंडी, पाणी विक्रीचा व्यवसायही तेजीत आला. साऊंड सर्व्हिसवाल्यांचाही व्यवसाय वधारला. (जिल्हा प्रतिनिधी)