हदगावच्या जुन्या तहसीलला भयंकर आग

By Admin | Updated: March 20, 2016 01:02 IST2016-03-20T00:54:46+5:302016-03-20T01:02:21+5:30

हदगाव : येथील निजामकालीन तहसील कार्यालयाला १८ मार्च रोजी आग लागून उपविभागीय कार्यालयाचे कालबाह्य रेकॉर्ड जळाले़ आगीवर नियंत्रण ठेवण्यास अर्ध्या तासातच यश आले़

Fierce fire to the old tehsil of Hudgaon | हदगावच्या जुन्या तहसीलला भयंकर आग

हदगावच्या जुन्या तहसीलला भयंकर आग

हदगाव : येथील निजामकालीन तहसील कार्यालयाला १८ मार्च रोजी आग लागून उपविभागीय कार्यालयाचे कालबाह्य रेकॉर्ड जळाले़ आगीवर नियंत्रण ठेवण्यास अर्ध्या तासातच यश आले़
शुक्रवारी दुपारी खिडकीतून धूर निघत असल्याचे समोरील दुकानदाराने बघितले़ त्याने ही माहिती तहसील कार्यालयाला कळविली़ नायब तहसीलदार व्ही़ आऱ नरवाडे, नायब तहसीलदार राठोड, पेशकार संजय गोडबोले, तलाठी पुपाटे, कापसे, पालिका मुख्याधिकारी पेंटे, अभियंता वानखेडे, माजी नगसेवक सुनील सोनुले, पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, प्रियंका वासनिक आदींनी घटनास्थळी भेट दिली़ अर्ध्या तासातच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले़
शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ पोलिसांनी तहसीलचे गेट बंद करून कोणालाही मध्ये येवू दिले नाही़ याबद्दल तहसीलदार संदीप कुलकर्णी म्हणाले, नवीन जागी स्थलांतरित होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला़ महत्त्वाची कागदपत्रे, अभिलेखे नवीन तहसीलमध्ये सुरक्षित आहेत़ जुन्या तहसीलमध्ये निकामी कागदपत्रे होती, असे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)

Web Title: Fierce fire to the old tehsil of Hudgaon