भरधाव कार पुलावरून नाल्यात कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 21:43 IST2018-11-30T21:41:38+5:302018-11-30T21:43:12+5:30
औरंगाबाद : नातेवाईकाला भेटण्यासाठी जाणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यावरील पुलाच्या कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना केंब्रिज चौक ते सावंगी बायपासवरील कृष्णपूरवाडी फाट्याजवळ घडली. गणेश काकासाहेब शेळके (३२, रा. कुंभेफळ), असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे.

कुंभेफळ येथील रहिवासी गणेश शेळके शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या कारने (एमएच २०-ई ई -९२५१ ) फुलंब्री तालुक्यातील पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. कृष्णपूरवाडी फाट्याजवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकून खाली कोसळली. यात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला.
कृष्णपूरवाडी येथील नागरिकांना हा अपघात दिसताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेश यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी गणेश यांना तपासून सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास तपासून मृत घोषित केले. तपास पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जनार्दन मुरमे करीत आहेत.