भरधाव टँकरच्या धडकेने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 21:30 IST2019-06-11T21:29:56+5:302019-06-11T21:30:06+5:30
टोल नाक्याजवळ भरधाव पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर तिचा मुलगा जखमी झाला आहे.

भरधाव टँकरच्या धडकेने महिला ठार
चितेगाव : औरंगाबाद - पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील टोल नाक्याजवळ भरधाव पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर तिचा मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. हिराबाई रमेश नेमाने असे मृताचे नाव आहे.
औरंगाबादकडून येणाऱ्या दुचाकीला (एम.एच.२० ई डी. ३०२५) पाणी घेवून जाणाºया टँकरने चितेगाव येथील टोलनाक्याजवळ जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील हिराबाई रमेश नेमाने (४५, रा. लासुर स्टेशन) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा दीपक (२८) हा जखमी झाला.
अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरुन पसार झाला. बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रकाश शिंदे यांनी टोल नाक्यावरील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात टँकरबाबतची माहिती मिळाली असून, त्याचा क्रमांक एम.एच.२० एस.टी. ६०९२ हा असल्याचे दिसून आले आहे. या आधारे पोलिसांनी टँकरचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.