भरधाव दुचाकीच्या धडकेने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:25 IST2019-02-12T22:25:16+5:302019-02-12T22:25:30+5:30
जालन्याकडे जाणाऱ्या भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाºया महिलेचा मृत्यू झाला.

भरधाव दुचाकीच्या धडकेने महिला ठार
करमाड : जालन्याकडे जाणाऱ्या भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाºया महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गाढेजळगाव फाट्याजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मुक्ताबाई भीमराव साबळे (६८) असे मृत महिलेचे नाव आहे.
फुलंब्री तालुक्यातील पायगा गेवराई येथील मुक्ताबाई साबळे या लग्न समारंभासाठी सोमवारी गोलटगाव येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या गाढेजळगाव येथे बहिणीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथून गावाकडे जाण्यासाठी त्या गाढेजळगाव फाट्यावर रस्ता ओलांडत असताना जालन्याकडे भरधाव जाणाºया दुचाकीने (एम. एच. १४ जी. इ.९४३) धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. लोकांनी त्यांना औरंगाबाद येथील घाटी दवाखाण्यात दाखल केले.
उपचारादरम्यान त्यांचा सायंकाळी साडेपाच वाजता मृत्यू झाला. जनार्धन भिकाजी साबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीचालक गजानन प्रकाश चव्हाण (रा. मंठा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.